आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील वृद्ध व्यक्तींचा अनुभव नेहमी आपल्या कामी येतो, यामुळे वृद्धांचा सन्मान करावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लोककथेनुसार, एका राज्यात एक तरुण व्यक्ती राजा बनला. त्याने मंत्र्यांना आदेश दिले की, वृद्ध लोक आपल्या काहीही कामाचे नाहीत. हे नेहमी आजारी राहतात, कोणतेही काम करत नाहीत यांच्यामुळे राज्याचा पैसा व्यर्थ खर्च होतो. यामुळे सर्व वृद्ध लोकांना मृत्युदंड देण्यात यावा.


> हा आदेश संपूर्ण राज्यात पसरताच सर्व वृद्ध लोक रात्रीतून राज्य सोडून दुसऱ्या राज्यात निघून गेले. एक गरीब मुलाचे आपल्या वडिलांवर खूप प्रेम होते, त्याच्याकडे वडिलांना दुसऱ्या राज्यात पाठवण्यासाठी पैसेही नव्हते. यामुळे त्याने घरातच वडिलांना लपवून ठेवले.


> काही दिवसानंतर त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. यामुळे राजाला प्रजेच्या आहाराची, पाण्याची व्यवस्था कशी करावी याचा प्रश्न पडला. दुष्काळामुळे तो काहीही करू शकत नव्हता. 
> गरीब मुलाने दुष्काळातुन मार्ग काढण्यासाठी वडिलांना उपाय विचारला. त्या राज्यापासून काही अंतरावरच हिमालय पर्वत होता. वडील मुलाला म्हणाले, उन्हाळ्यात हिमालयाचा बर्फ वितळू लागले आणि ते पाणी राज्याकडे वाहत येईल. ते पाणी येथे येण्याच्या आत तू एक काम कर, राज्याच्या मार्गावर दोन्ही बाजूला नांगर चालव.


> मुलाने राज्यातील इतर लोकांनाही हा उपाय सांगितला परंतु कोणीही त्याचे ऐकले नाही. एकट्यानेच त्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला नांगर चालवला. काही दिवसांनी हिमालयाचे पाणी राज्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर राज्याच्या मार्गावर दोन्ही बाजूला धान्य उगवले.


> ही गोष्ट राजाला समजल्यानंतर त्याने गरीब मुलाला दरबारात बोलावून घेतले. राजाने मुलाला विचारले, धान्य पिकवण्याचा हा उपाय तुला कोणी सांगितला?


> महाराज, हा उपाय मला माझ्या वडिलांनी सांगितला होता. तुम्ही वृद्ध लोकांना मारण्याचा आदेश दिल्यानंतर मी माझ्या वडिलांना घरातच लपवून ठेवले होते. हे ऐकून राजाने त्या वृद्ध व्यक्तीलाही दरबारात बोलावून घेतले.


> वृद्ध व्यक्ती राजाला म्हणाला, महाराज आपल्या राज्यातून जे लोक शेतामधून धान्य घरी घेऊन जात होते आणि जे लोक इतर राज्यामध्ये धान्य विकण्यासाठी घेऊन जायचे त्या धान्यामधील काही दाणे रस्त्यावर पडायचे. माझ्या मुलाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला नांगर चालवला आणि हिमालयातून आलेल्या पाण्यामुळे दाणे अंकुरित झाले.


> वृद्ध व्यक्तीचे बोलणे ऐकून राजाला आपल्या आदेशाचा पश्चताप झाला आणि राज्यातून गेलेल्या सर्व वृद्ध लोकांना त्याने परत बोलावून घेतले.


कथेची शिकवण 
कथेची शिकवण अशी आहे की, वृद्ध लोक बिनकामाचे नसतात. त्यांचे अनुभव आपल्याला मोठमोठ्या अडचणींमधून सहज बाहेर काढू शकतात. यामुळे वृद्धांचा नेहमी सन्मान करावा.

बातम्या आणखी आहेत...