आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंदीप शिंदे
माढा (सोलापूर) - विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार हे राज्यभरात सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरले. राष्ट्रवादीला यंदा मोठे यश मिळाले. त्यात साताऱ्यातील पावसातील सभा ही अधिक फायदेशीर ठरली असल्याचे भाजप खासदार नाईक निंबाळकर यांनी मान्य केल आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार माझ्या संपर्कात आहेत. भाजपा शिवसेना भावंडे आहेत ती एकत्रच येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या माढा करमाळा भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. माढ्यातील शासकीय विश्रामगृहात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे प्रातिंक सदस्य राजकुमार पाटील, संजय कोकाटे, राजेंद्र चवरे, गणेश चिवटे, तानाजी जाधव, प्रातांधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण आदीसह शासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले की, भाजपाचे आमदार माझ्या संपर्कात असल्याचे अजित पवार म्हणत आहेत. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार माझ्याही संपर्कात आहेत. मात्र त्यांची नावे मी सांगू शकत नाही. बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. ही दुर्दैवी बाब असुन शिवसेनेने महायुतीचा आदर करावा. जनतेला भाजप-शिवसेना एकत्रित बघायचीय. जनमताचा कौल शिवसेना राखेल. घरामध्ये भांडण होत असतात. ते जीवंतपणाचं लक्षण असतं. भावाभावांमध्ये देखील भांडणे होतात. हा धाकट्या-थोरल्या दोघा भावातला वाद निश्चितच मिटेल. ढग आले तरी ते पुढे निघुन जातात. भाजपा शिवसेनेचे जुनं प्रेम आहे ते यापुढे ही असेच राहिल. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कुंबड्यावर शिवसेना टिकेल का? याचे आकलन उद्धव ठाकरे यांना आहेच. राम मंदिराच्या विषयाचे आम्ही श्रेय घेतलेले नाही. तो आमचा अजेंडा होता आणि तो पुर्ण केलाय.
महाशिव आघाडी स्थापन झाली तर भाजपाची विरोधात बसायची मानसिकता आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, राजकारणात जर-तर या प्रश्नावर बोलणे उचित नाही असे म्हणाले. मी पुन्हा येईन या मुख्यमंत्री फडणविस यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने विरोधकांकडून अति आत्मविश्वास नडला अशी टीका होत आहे यावर खा.नाईक निंबाळकर यांनी आम्हाला विश्वासच आहे की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा येऊन मुख्यमंत्री होतील. माझ्यावर पाठीच्या दुखन्यावर शस्त्रक्रिया मात्र उपचाराच्या गोळ्या खाउन देखील पाहणी दौरा करतोय. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती उदयनराजे व मोहिते पाटील यांचे पुनर्वसन भाजपा करणार
छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यातील महत्वाची जबाबदारी किंवा त्यांना राज्यसभेवर घेण्याची सकारात्मकतेची पावले उचलणे सुरु आहेत. तसेच अकलुजच्या मोहिते पाटील यांचेही राजकीय पुनर्वसन होईल. एप्रिल महिन्यात आपल्याला ते दिसुनच येईल. असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.
माढ्यातील रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा देण्याची मागणी
माढा रेल्वे स्थानकावर हुतात्मा, इंद्रायणी, विजापुर मुंबई पॅसेजर, गदग एक्सप्रेस, हैद्राबाद मुंबई या रेल्वे गाड्यांना माढा स्थानकावर थांबा देण्याची मागणी माढा प्रवासी सेवा संघाच्या वतीने उपाध्यक्ष अनिल शहाणे यांनी तसेच जगदंबा अनुसूचित जाती जमाती सुतगिरणीच्या कामगारांनी ही प्रलंबित मागण्याचे गाऱ्हान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनातून मांडलं. निश्चितच दोन्ही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन निंबाळकर त्यांनी यावेळी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.