Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | For taking mother's murder avenge hi husband kill his wife

खून का बदला खून: परभणीत आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी युवकाने पत्नीचा गळा आवळला

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 12:35 PM IST

लग्नाच्या कारणावरून आईचा खून झाल्याचा राग त्याच्या मनात होता.

 • For taking mother's murder avenge hi husband kill his wife

  परभणी- आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पतीनेच स्वतःच्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली. वांगी रस्त्यावरील नूतननगरात घडलेल्या या थराराची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पती फरार आहे.

  याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांगी रस्त्यावरील हडको परिसरातील नूतननगरात आनंद नाथा खंदारे (२५) हा पत्नी मयूरी खंदारे (२०) हिच्यासोबत वास्तव्यास आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी आनंदने मयूरीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी १८ नोव्हेंबर रोजी आनंदची आई गयाबाई नाथा खंदारे हिचा खून झाला होता. या खून प्रकरणात मयूरीचे वडील चंद्रकांत वाकळे याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मयूरीचे वडील चंद्रकांत हे सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

  लग्नाच्या कारणावरून आईचा खून झाल्याचा राग आनंदच्या मनात होता. त्यामुळे तो या खुनाच्या बदला घेण्याच्या प्रयत्नात होता. तो सातत्याने पत्नी मयूरीला मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार करीत होता. यातूनच त्याने मंगळवारी (दि.१२) रात्री ते बुधवारी (दि. १३) सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरी मयूरीचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तो लगेचच फरार झाला. हा प्रकार सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आला.

  मयूरी व आनंद हे किरायाच्या घरात राहत होते. बुधवारी सकाळपर्यंत दरवाजा उघडत नसल्याने घरमालकाने आवाज दिल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने घरमालकाने नानलपेठ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दुपारी १२ च्या सुमारास पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, श्री सोडगीर यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडला असता मयूरी फरशीवर मृतावस्थेत आढळून आली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

  दरम्यान, मयूरीची आई संगीता वाकळे (३८, रा. पंचशीलनगर) हिने दिलेल्या फिर्यादीवरून आनंद नाथा खंदारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending