Home | Maharashtra | Mumbai | For the Decision of demonitization People of this country will clash you - Sanjch Nirupam

देशाची जनताच तुम्हाला फासावर लटकावेल; संजय निरूपम यांची नरेंद्र मोदींवर सडकून टीका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 05:54 PM IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर बायबाय करण्याची वेळ येणारच.

  • For the Decision of demonitization People of this country will clash you - Sanjch Nirupam

    मुंबई- नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. निरुपम यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर बायबाय करण्याची वेळ येणार असल्याचे ते म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाचा देशातील सामान्य जनतेला फटका बसला होता तर मोदी जापानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत होते. त्यांच्या मूर्खपणामुळे 150 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. काहींचे तर ठरलेले लग्न मोडावे लागले होते, असे घणाघाती आरोप निरुपम यांनी केले. मोदींवर टीका करतांना ते म्हणाले की, 'मोदींनी सामान्य लोकांच्या अडचणींमध्ये भर घालण्यासाठी नोटबंदीसारखा कठोर निर्णय घेतला. मी तुम्हाला आव्हान करतो की, मोदींना त्यांची जागा दाखवून द्या. मोदी पुन्हा निवडून आले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल. लोकांचे जगणे अवघड होईल.' नोटाबंदीला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मी भाजपवाल्यांना आणि मोदींना त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करुन देतो, असे म्हणत निरुपम यांनी खोचक टीका केली. आम्ही तुमच्यासारखे क्रूर नाहीत पण आम्ही तुम्हाला शारिरीकरित्या नाहीतर राजकीयपद्धतीने फासावर लटकावू, अशा शब्दांत निरुपम यांनी मोदींचा समाचार घेतला.

Trending