आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time After 2002 In Ayodhya; Today Will Be Uddhav, Tomorrow VHP Dharmasabha

अयोध्येत 2002 नंतर प्रथमच मोठ्या छावणीचे स्वरूप; आज उद्धव येणार, उद्या विहिंप धर्मसभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या/ नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मंदिर उभारणीसाठी भाजपवर दबाव आणू पाहणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येत दाखल होत असून त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून तीन विशेष रेल्वे आणि अनेक बसनी हजारो शिवसैनिकांनी अयोध्येकडे कूच केली आहे. दरम्यान, रा. स्व. संघ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी आयोजित धर्मसभेसाठी अयोध्येत मोठ्या संख्येने लोक दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाच्या २००२ मधील शिलादान कार्यक्रमानंतर प्रथमच राम जन्मभूमीत बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला आहे. 


अयोध्येला सध्या मोठ्या छावणीचे स्वरूप आले असून सुमारे ७० हजार सुरक्षा जवान या भागांत तैनात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार वादग्रस्त वास्तूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. अयोध्येत दहशतवादविरोधी पथकांसह अतिरिक्त पोलिस दल, निमलष्करी दलांसह ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे.

 

उत्तर प्रदेश सरकारच्या ‘पॅक’च्या (प्रोव्हेन्सियल आर्मड् कॉन्टॅबलरी) ४८ तुकड्या संवेदनशील भागांत तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय अयोध्येत १४४ कलम लागू करण्यात आले असून कुठेही परवानगीविना कार्यक्रम किंवा सभा आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अयोध्येत ८ विभाग आणि १६ सेक्टरमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक विभागात पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तैनात करण्यात आले आहे. 


शेवटची धर्मसभा
मंदिर बांधकाम सुरू होण्यापूर्वीची ही शेवटची धर्मसभा असल्याचे विहिंपने जाहीर केले आहे. यासाठी १ लाख लोक अयोध्येत दाखल होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

 

मंदिराला विराेध करणाऱ्यांना देशात फिरणे मुश्कील हाेईल

मंदिराला विरोध करणाऱ्यांना फिरणे मुश्कील होईल, असा इशारा देताना ‘अाधी मंदिर अाणि नंतर सरकार’ असा शिवसेनेचा नारा असल्याचे राऊत म्हणाले. 

 

१७ मिनिटांत बाबरी ताेडली, मंदिर कायद्यासाठी कितीसा वेळ लागेल?

अयाेध्या । ‘अाम्ही जर १७ मिनिटांत बाबरी मशीद पाडू शकताे, तर अयाेध्येत राम मंदिर उभारण्यासाठी अाम्हाला किती वेळ लागेल?,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपला अाव्हान दिले. इतकेच नव्हे, तर राम मंदिराला देशभरातून पाठिंबा मिळत अाहे, जाे काेणी मंदिर उभारण्यास विराेध करेल त्याला देशात फिरणे मुश्कील हाेईल, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी विराेधकांना दिला. मंदिर उभारणीसाठी भाजप सरकारवर दबाव टाकण्याची माेहीम शिवसेनेने हाती घेतली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी व रविवारी अयाेध्येत दाखल होत आहेत. या दाैऱ्याच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत अयाेध्येत तळ ठाेकून अाहेत.


अध्यादेश लागू करा : शुक्रवारी त्यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, ‘सध्या राष्ट्रपती भवनापासून ते उत्तर प्रदेशापर्यंत भाजपचे सरकार अाहे. राज्यसभेतही राम मंदिर उभारणीस अनुकूल भूमिका असणारे बहुतांश खासदार अाहेत. त्यामुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास भाजप सरकारला काहीही अडचण येणार नाही.  त्यामुळे सरकारने तातडीने याबाबतचे अध्यादेश लागू करावा.’

 

राऊत म्हणाले, ‘राम मंदिर व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अामच्या पक्षाने नेहमीच प्रतिष्ठा पणाला लावली अाहे. त्यामुळेच ‘अाधी मंदिर अाणि नंतर सरकार’ असा अामचा नारा अाहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच राम मंदिराचे समर्थन केले. ते स्वत: अयाेध्येत येऊ इच्छित हाेते. गेल्या २५ वर्षांपासून अयाेध्येशी अामचे भावनिक नाते अाहे. मुख्यमंत्री याेगींना अाम्ही संत मानताे. त्यांचीही मी भेट घेतली अाहे. त्यांच्या अाशीर्वादानेच अाम्ही कार्यक्रम घेत अाहाेत. जाहीर सभेसाठी अाम्ही सरकारकडे परवानगी मागितलेली नाही.
शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या वेळी अयाेध्येतच विश्व हिंदू परिषदेनेही काही कार्यक्रमांचे अायाेजन केले अाहे. त्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, विहिंप व शिवसेनेत काेणताही वाद नाही. जर अाम्हाला विहिंपच्या धर्मसभेबाबत अाधी नियाेजन कळले असते तर अाम्ही एकत्रच कार्यक्रम घेतला असता. त्यांच्या अाणि अामच्या भूमिकेत काहीही फरक नाही.’

 

बातम्या आणखी आहेत...