आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time, Akshay Kumar's Film Reached The Record Of 200 Crores, 'Mission Mangal' Kalekshan In 29 Days

पहिल्यांदा 200 कोटींच्या पुढे पोहोचला अक्षय कुमारचा चित्रपट, 'मिशन मंगल' ने 29 दिवसात बनवला रेकॉर्ड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 100 कोटींचे चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारच्या खात्यात पहिला 200 कोटीच्या चित्रपटाचा रेकॉर्ड जोडला गेला आहे. 'मिशन मंगल' ने चौथ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशनवर आधारित चित्रपटाने 100 कोटींची कमाई पहिल्या 5 दिवसांत केली आहे. 
 

 

चित्रपटाशी निगडित काही खास रेकॉर्ड... 
'मिशन मंगल' च्या नावे आणखी एक रेकॉर्ड बनला आहे. तो आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रिलीज झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई करण्याचा.  यापूर्वी हा रेकॉर्ड सलमान खानचा चित्रपट 'एक था टायगर' च्या नावे होता. तसेच 2019 मध्ये 200 कोटी कमावणाऱ्या चित्रपटांमध्ये 'मिशन मंगल' चौथा चित्रपट बनला आहे. यापूर्वी 'कबीर सिंह', 'भारत', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' नेही एवढाच बिजनेस केला आहे.  
 

हे आहेत 100 कोटींच्या पुढे पोहोचलेले अक्षयचे 12 चित्रपट...  
 
'टॉयलेट एक प्रेम कथा' - 134.25 कोटी
'राउडी राठौर' - 133 कोटी
'एअरलिफ्ट' - 129 कोटी
'रुस्तम' - 128 कोटी
'जॉली एलएलबी 2' - 117 कोटी
'हाउसफुल 2' - 116 कोटी
'हॉलीडे' - 113 कोटी
'हाउसफुल 3' - 109 कोटी
'गोल्ड' - 105 कोटी
'2.0' - 185 कोटी
'केसरी' - 151 कोटी
'मिशन मंगल' - 200.16 कोटी
 
चित्रपट 'मिशन मंगल' च्या 29 दिवसांच्या कलेक्शनच्या आधारे. 

बातम्या आणखी आहेत...