आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time At The Age Of 20, Javed Akhtar Wrote The Screenplay, Worked With Salim Khan For 11 Years, Then Became A Songwriter.

वयाच्या 20 व्या वर्षी प्रथमच चित्रपटाची पटकथा लिहिली, सलीमसोबत 11 वर्षे काम केले, त्यानंतर गीतकार झालो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मैं कोई ऐसा गीत गाऊं'मध्ये सहभागी झाले जावेद अख्तर
  • जावेद अख्तर म्हणालेे, दीड हजार गीते लिहिली, प्रत्येक गाण्याची एक कथा आहे

​​​​​​जयपूर : राजस्थानातील दैनिक भास्करच्या ऐतिहासिक यशास २३ वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ आयोजित भास्कर उत्सवात मंगळवारी सायंकाळी गीतकार जावेद अख्तर यांनी वाचक व साहित्यप्रेमींशी संवाद साधला. रवींद्र व्यासपीठावर आयोजित म्युझिकल इव्हिनिंग 'मैं कोई ऐसा गीत गाऊं'मध्ये पद्मभूषण जावेद अख्तर यांनी आपण नेहमी गुणगुणाऱ्या त्यांच्या गीतामागील कथा सांगितल्या. जावेद यांच्यासमवेत गायक पार्थिव गोहिल व जान्हवी उपस्थित होते. या वेळी जावेद म्हणाले, मी सुमारे दीड हजार गाणी लिहिली आहेत. प्रत्येक गाण्यामागे एक कथा आहे. मी पहिल्यांदा वयाच्या २० व्या वर्षी एका चित्रपटाची पटकथा लिहिली. १९७० पासून कामास सुरुवात केली. सुमारे ११ वर्षे सलीम यांच्यासमवेत पटकथा लिहिल्या. यानंतर गीतकार झालो. यश चोप्रासमवेत काम केले. 'धर्मयुग'मध्ये पहिल्यांदा कविता प्रसिद्ध झाली.

यश चोप्रांच्या आग्रहावरून 'सिलसिला'ची गाणी लिहिली

फार कमी लोकांना मी कविताही लिहितो याची कल्पना होती. यश चोप्रा यांनाही हे माहिती होते. एकदा सकाळीच ते माझ्याकडे आले आणि त्यांनी 'सिलसिला' चित्रपटासाठी गाणी लिहिण्याचा प्रस्ताव ठेवला. यात नायक कवी आहे. मी त्यांना नकार दिला. यशजी खूप जिद्दी होते. त्यांनी खूपच आग्रह केल्यानंतर मी तयार झालो. गाणी एका सुरावटीवर लिहायची असतात. मला लिहिता येईल का? याबद्दल साशंक होतो. यश चोप्रा यांच्या घरी गेलो. तेथे हरिप्रसाद चौरसिया व पंडित शिवकुमार उपस्थित होते. त्यांनी एक धून ऐकवली. तेव्हा 'देखा एक ख्वाब तो सिलसिले हुए'चा मुखडा लिहिला. नंतर इतरही गाणी लिहिली.