• Home
  • National
  • For the first time bye election in j&K after deletion of Article 370

जम्मू-काश्मीर / कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पाेटनिवडणूक, परिस्थिती सर्वसामान्य, पण माेबाइल बंदीमुळे अडचण

५ ते ८ मार्चपर्यंत निवडणुका रंगणार, अंदाजे १५ हजार पदे रिक्त

वृत्तसंस्था

Feb 14,2020 09:41:00 AM IST

जम्मू - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पंचायतीच्या रिक्त असलेल्या १३ हजार पदांसाठी पाेटनिवडणुका घेण्याचे पहिल्यांदाच जाहीर करण्यात आले आहे. या पाेटनिवडणुका आठ टप्प्यांमध्ये हाेणार असून त्या ५ मार्चला सुरू हाेऊन २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक आयुक्त शैलेंद्र कुमार म्हणाले, राज्याच्या प्रत्येक ब्लाॅकमध्ये रिक्त असलेल्या पंचायत प्रतिनिधींसाठी निवडणुका हाेतील. या निवडणुकांमध्ये बॅलेट बाॅक्सचा उपयाेग केला जाईल. जम्मू आणि काश्मीर या दाेन्ही ठिकाणी चार-चार टप्प्यांत मतदान हाेईल. २०१८ मध्ये राज्याच्या मुख्य पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यामुळे येथे निवडणुका घेता आल्या नाहीत, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. लडाख या दुसऱ्या केंद्रशासित राज्याने मागणी केलेली नसल्याचे तेथे पाेटनिवडणुका हाेणार नाहीत. सध्या लडाखमध्ये माेठ्या प्रमाणावर बर्फ साठला असल्याचे कुमार म्हणाले.


२५ विदेशी राजकीय प्रतिनिधींना सेनेने सुरक्षेची दिली माहिती


कलम ३७० हटवल्यानंतर जवळपास सहा महिन्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरमध्ये आलेल्या विदेशी राजकीय प्रतिनिधींना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षिततेची माहिती दिली. राजकीय प्रतिनिधींच्या गटाने गुरुवारी उपराज्यपाल, व्यावसायिकांचे प्रतिनिधी आदींसह २० संघटनांच्या लाेकांची भेट घेतली. बुधवारी येथे आलेल्या गटामध्ये फ्रान्स, युराेपीय राष्ट्र संघ यासह २५ देशांच्या राजकीय प्रतिनिधींचा समावेश आहे.

परिस्थिती सर्वसामान्य, पण माेबाइल बंदीमुळे अडचण

२५ सदस्यांच्या गटाने येथील लाेकांची भेट घेतल्यानंतर काश्मीर खाेऱ्यातील परिस्थिती सामान्य हाेत असल्याचे सांगितले. लाेक आपले व्यवहार नेहमीसारखे करत असून वाहतूक पूर्ववत सुरू आहे. परंतु, माेबाइलवरील बंदीमुळे लाेकांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. येथून परतल्यानंतर आपल्या देशातील लाेकांना जम्मू- काश्मीरला जाण्यासाठी आग्रह करणार असल्याचे राजकीय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सांगितले.

X