आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७२ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी | भारत-आॅस्ट्रेलिया चौथ्या कसोटीत शेवटच्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. हा सामना अनिर्णीत ठरला. यासोबतच टीम इंडियाने ४ सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने ऑस्ट्रेलियात ७२ वर्षांनंतर मालिका जिंकली. असा पराक्रम करणारा भारतीय संघ हा पहिलाच आशियाई संघही ठरला आहे.

 

जबरदस्त फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दाैऱ्यात यजमान अाॅस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसाेटी मालिका विजय मिळवला. भारताला ७२ वर्षांनंतर हा इतिहास रचता अाला. यासह अाॅस्ट्रेलियावर कसाेटी मालिका विजय संपादन करणारा भारत हा पहिला अाशियाई देश ठरला. तसेच अाठ वा त्यापेक्षा अधिक देशांत जाऊन कसाेटी मालिका विजयाची नाेंद करणारा भारत हा अाशियाईतील पहिला संघ ठरला अाहे.तसेच अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चाैथा संघ ठरला. यापूर्वी अाॅस्ट्रेलिया, अाफ्रिका अाणि इंग्लंडने असा पराक्रम गाजवला अाहे. तसेच काेहलीच्या नेतृत्वात भारताने विदेश दाैऱ्यात ११ वी कसाेटी जिंकली. यासह त्याने माजी कर्णधार गांगुलीच्या विक्रमाची बराेबरी साधली. अाॅस्ट्रेलिया अाणि भारत यांच्यातील चाैथी कसाेटी पावसाच्या व्यत्ययामुळे साेमवारी ड्राॅ झाली. त्यामुळे भारताने ही चार कसाेटी सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. भारताने सात दशकांनंतर हे माेठे यश संपादन केले अाहे. येत्या १२ जानेवारीपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. 

 

बातम्या आणखी आहेत...