आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • For The First Time In Six Years In India, The Decrease In Air Travel: ITA Report

भारतात ६ वर्षांत पहिल्यांदाच हवाई प्रवासात घट : आयटाचा अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - खासगी विमानसेवा कंपनी जेट एअरवेज बंद झाल्याने एप्रिलमध्ये देशातील हवाई प्रवासात सहा वर्षांत पहिल्यांदाच घट नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघ (आयटा) च्या अहवालानुसार, मागील वर्षी एप्रिलच्या तुलनेमध्ये या वर्षी एप्रिलमध्ये देशातील हवाई वाहतुकीत ०.५ टक्क्यांची घट झाली आहे. आयटा “महसूल-प्रवासी-किलोमीटर’मध्ये हवाई प्रवासाची आकडेवारी जारी करते. याआधी डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये देशांतर्गत मार्गावरील प्रवाशांची संख्या ४.५० टक्क्यांनी कमी झाली होती. एप्रिल महिन्यात जागतिक हवाई प्रवासामध्ये ४.३ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उपलब्ध सीट किलोमीटरमध्ये ३.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर भरलेल्या सिटांच्या सरासरीत (पीएलएफ) ०.६ टक्क्यांची वाढ होऊन ८२.८ टक्क्यांवर पोहोचली आहे. देशांतर्गत मार्गावर उड्डाणांबाबत २.८ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.