Maharashtra Special / देशात पहिल्यांदाच आयोजित होत आहे 'टिक टॉक फिल्म फेस्टिव्हल', जिंकणाऱ्याला मिळेल कॅश प्राइज

फिल्‍म फेस्‍ट‍िव्हल टिक टॉक यूझर्ससाठी मोठी संधी आहे

दिव्य मराठी वेब

Aug 14,2019 09:29:00 PM IST

पुणे- सोशल व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिक टॉकबद्दल लोकांची लोकप्रियता वाढवण्यासाठी शहरात 'टिक टॉक फिल्म फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये सामील होणाऱ्या फिल्मला 3333 पासून 33 हजार रुपयांपर्यंतचे प्राइज मिळणार आहे. आयोजकांनुसार, या प्रकारचा हा पहिलाच फिल्म फेस्टिव्हल आहे. या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन 21 सप्टेंबरला पुण्यातील घोले रोडवर असलेल्या नेहरू हॉलमध्ये आहे. यात भाग घेण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत स्पर्धकांना आपले व्हिडिओ पाठवावे लागणार आहेत.


रजिस्ट्रेशन करावे लागेल
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या शॉर्ट फिल्म सामील करण्यासाठी रजिस्‍ट्रेशन करावे लागेल. यासाठी फीस भरावी लागणार आहे. फिल्‍म फेस्‍ट‍िव्हलचे ऑर्गेनायजर प्रकाश यादव यांनी सांगितले की, "हे फिल्‍म फेस्‍ट‍िव्हल टिक टॉक यूझर्ससाठी मोठी संधी आहे. ते जगाला आपली प्रतिभा दाखवू शकतात."


अशी आली या या स्पर्धेची कल्पना
प्रकाश यादवने सांगितले, "मी रोज कॉलेज स्‍टूडेंट्सला पाहतो. ते अनेक व्हिडिओ बनवतात. मला त्यांना एक मोठा मंच द्यायचा होता. फिल्‍म फेस्‍ट‍िव्हलमध्ये एंट्री पाठवण्यासाठी रजिस्‍ट्रेशन कराव लागणार आहे. यात अनेक कॅटेगरीजमध्ये प्राइज आहे, ज्यात बेस्‍ट इन कॉमेडी, बेस्‍ट इन प्रँक आणि सोशल अवेअरनेससारख्या कॅटेगरी आहेत."

X
COMMENT