political / डेमोक्रॅटिकच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या १० उमेदवारांत पहिल्यांदाच सिंगल टेबल चर्चा, बायडेन यांची ओबामांच्या धोरणाच्या साहाय्याने चर्चेत सरशी

विजेते : जो. बायडेन, बॅट ओरुर्के, कमला हॅरिस पराभूत : ज्युलियन कास्त्रो, वॉरेन, यांग.

प्रतिनिधी

Sep 14,2019 09:46:00 AM IST

ह्यूस्टन : अफगाणिस्तानात दहशतवाद पुन्हा वाढू लागला आहे. त्यापासून अमेरिका स्वत:चा बचाव करू शकते. परंतु त्यासाठी पाकिस्तानने दहशतवादविरोधी मोहीम चालवण्यासाठी तेथील ठिकाणांचा वापर करू द्यावा, हे गरजेचे आहे. त्यावर आपण भर द्यायला हवा, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील डेमोक्रॅटअंतर्गत शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेले जो. बायडेन यांनी शुक्रवारी म्हटले.बायडेन यांनी २०२० साठी तिसऱ्या डेमोक्रॅटिक पार्टीअंतर्गत चर्चेत गुरुवारी आक्रमक पवित्र्याचे दर्शन घडवले. माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडेन (७६) यांनी तीन तासांच्या चर्चेत उदारमतवादी बर्नी सँडर्स व एलिझाबेथ वॉरेनला चांगलेच घेरल्याचे दिसून आले. कळीच्या मुद्द्यांवर मतभेद : चर्चेदरम्यान बायडेन यांनी ओबामा यांच्या धोरणांनाच पुढे घेऊन जायला हवे, असे मत मांडले. त्यावर सँडर्स व वॉरेन यांनी विरोध केला. बंदूक, विदेश, स्थलांतर धोरणावरही एकवाक्यता नव्हती.


ओबामा यांच्या धोरणावर डेमोक्रॅट्समध्ये मतभेद, अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक-२०२०
डेमोक्रॅटिक पार्टीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांतील ही चर्चा तीन तास रंगली होती.


यंदा आणखी तीन चर्चा अपेेक्षित, पुढील चर्चा ओहियोत
डेमोक्रॅटिक पार्टीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांतील ही तिसरी चर्चा होती. चौथी ओहियोत होईल. त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये आणखी चर्चा होतील.
दुसऱ्या चर्चेसाठी २० पैकी १४ उमेदवार पात्र ठरले होते. तिसऱ्या चर्चेसाठी १० उमेदवार रिंगणात उतरू शकले होते.
चर्चेत बायडेन, सँडर्स, एलिझाबेथ वॉरेन, कमला हॅरिस, पीट बुतिगिएग, कोरी, ब्रुकर, अॅमी क्लोबचर, अंड्रयू यांग, ज्युलियन कास्रो, बॅट ओरुर्के सहभागी होते.


निदर्शकांनी चर्चा रोखली
बायडेनला उत्तर देतेवेळी काही निदर्शक व्यासपीठावर येऊन घोषणाबाजी करत होते. त्यामुळे चर्चा रोखण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले. मग पुन्हा चर्चा सुरू झाली.


५०० हून जास्त पत्रकारांनी केले कव्हर
छायाचित्र ह्यूस्टनच्या स्पिन कक्षाचे आहे. येथे डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवारांच्या शर्यतीची चर्चा कव्हर करण्यासाठी आलेले ५०० हून जास्त पत्रकार उपस्थित होते.

X
COMMENT