आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोच्या इतिहासात प्रथमच होणार 6 वाइल्ड कार्ड एंट्री,  सेलिब्रिटींचे नियोजन समजून घेत आहेत प्रवेश घेणारे स्पर्धक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 13'मध्ये शोच्या निर्मात्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सहा जणांना वाइल्ड कार्डमधून एंट्री दिली जाणार आहे. शोमध्ये प्रथमच वाइल्ड कार्डच्या माध्यमातून इतक्या लोकांना यात संधी मिळणार आहे.

शेफाली जरीवाला :
मी भाग्यवान आहे, मला एका टास्कद्वारे घरातल्या हालचाली टिपण्याची संधी मिळाली. घरातील प्रत्येकाचा स्वभाव मला कळाला आहे. आहे. तथापि, मला देवोलीनाचा खेळ अजिबात समजला नाही. तिच्याशी स्पर्धा मला जरा कठीण जाईल.

हिमांशी खुराणा : 
रश्मी देसाई खूप चांगल्या प्रकारे खेळत आहे. तिच्याशीच माझी स्पर्धा राहील. माझी एंट्री झाल्यावर मीदेखील चांगले खेळण्याचा प्रयत्न करेल. सध्या तर घरातील प्रत्येक स्पर्धकाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
 

हिंदुस्थानी भाऊ : 
मला वाटतं शहनाज गिल चांगला खेळ खेळत आहे. खरं सांगायचे झाले तर मला या शोमध्येही कुणीच विजेता दिसत नाही. सर्वच कार्टून दिसत आहेत. कोणी शिन चेन, तर कोणी डोरेमॉन सारखे. खरे सांगायचे तर मी या शोमध्ये यावे अशी माझ्या चाहत्यांची इच्छा होती.
 

अरहान खान : 
रश्मी आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. अफवा आहे की, रश्मी आणि माझे लग्न घरात होणार आहे, पण जे एकमेकांवर प्रेम करतात, त्यांचे लग्न होत असते किंवा तेच लग्न करतात. रश्मी आणि मी फक्त मित्र आहोत, त्यामुळे लग्नाचा प्रश्नच उद्भवत नाही. बिग बॉस घराच्या आत ऑरेंज मॅरेजबद्दलची गोष्ट शक्य नाही.