राज्यनामा / विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच ३० आमदारांचे राजीनामे

भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी अध्यक्ष बागडे यांना औरंगाबादेत चक्क दुचाकीवरून धावपळ करावी लागली. भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी अध्यक्ष बागडे यांना औरंगाबादेत चक्क दुचाकीवरून धावपळ करावी लागली.

इतक्या मोठ्या संख्येने राजीनामे स्वीकारण्याचाही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा विक्रम

Oct 13,2019 08:14:00 AM IST

चंद्रकांत शिंदे

मुंबई - राजकारणात आयाराम-गयारामांचे येणे-जाणे सतत सुरू असते. कधी नाराजीमुळे, कधी पक्ष लक्ष देत नसल्याने, तर कधी घरातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने आमदार राजीनामे देतात आणि दुसऱ्या पक्षात जातात. परंतु एकाच टर्ममध्ये जवळजवळ ३० च्या आसपास आमदारांनी राजीनामे देण्याची घटना विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. ३० आमदारांचे राजीनामे स्वीकारण्याचा अनोखा विक्रम यानिमित्ताने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत विरोधी पक्षांच्या अनेक आमदारांना गळाला लावले होते. त्यांना राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करवून घेतले गेले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही राजीनामे आले होते. आता विधानसभा निवडणुकीत तर निवडणूक अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत राजीनामे देऊन पक्षांतर करण्याचा सिलसिला सुरू होता. काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून अनेक जण भाजपत आले असून काही जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप आणि शिवसेना सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीत जाणाऱ्या आमदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. काही आमदार हे आता खासदार म्हणून लोकसभेत गेलेले आहेत.

हे आमदार झाले खासदार

1 गिरीश बापट (भाजप) - कसबा पेठ, पुण्याचे खासदार झाल्याने राजीनामा

2 बाळू धानोरकर (शिवसेना) वरोरा, चंद्रपूरचे काँग्रेस खासदार

3 प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना) – लोहा, नांदेडचे भाजप खासदार

4 इम्तियाज जलील (एमआयएम) - औरंगाबाद मध्यचे खासदार

५ जणांना भाजप, तिघांना शिवसेनेकडून तिकिटे

1. काशीराम पावरा : शिरपूर, धुळ्यातून भाजप उमेदवार

2. कालिदास कोळंबकर : वडाळा, मुंबईतून भाजप उमेदवार

3. गोपालदास अग्रवाल : गोंदियामधून भाजप उमेदवार

4. जयकुमार गोरे : माण, सातारामधून भाजप उमेदवार

5. नितेश राणे : कणकवली, सिंधुदुर्ग भाजप उमेदवार

6. अब्दुल सत्तार : सिल्लोड, औ.बाद, शिवसेना उमेदवार

7. निर्मला गावित : इगतपुरी, नाशिक, शिवसेनेच्या उमेदवार

8. भाऊसाहेब कांबळे : श्रीरामपूर, नगरमधून शिवसेना उमेदवार

9. भारत भालके : पंढरपूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार

भाजप : चार आमदारांनी दिलेत राजीनामे

दोघांना काँग्रेस, तर एकाला राष्ट्रवादीने दिली उमेदवारी

1 बाळासाहेब सानप : नाशिक पूर्वमधून राष्ट्रवादीचे उमेदवार

2 उदेसिंह पाडवी : शहादा, नंदुरबारमधून काँग्रेस उमेदवार

3 डॉ. आशिष देशमुख : काटोल, नागपूरमधून काँग्रेस उमेदवार

4 अनिल गोटे : धुळे, स्वत:चा पक्ष, पण महाआघाडी पुरस्कृत उमेदवार

राष्ट्रवादी : १० आमदारांचे राजीनामे

भाजपची तिघांना, तर शिवसेनेची चौघांना उमेदवारी

1. संदीप नाईक : आता भाजपमध्ये प्रवेश. भाजपकडून तिकीट मिळाले, मात्र ते वडील गणेश नाईकांना दिले.

2. वैभव पिचड : अकोले, अहमदनगरमधून भाजप उमेदवार

3. राणा जगजितसिंह : उस्मानाबादमधून भाजप उमेदवार

4. शिवेंद्रराजे भोसले : साताऱ्यातून भाजप उमेदवार

5. पांडुरंग बरोरा : शहापूर, ठाण्यामधून शिवसेना उमेदवार

6. अवधूत तटकरे : शिवसेनेत प्रवेश, मात्र उमेदवारी नाही

7. जयदत्त क्षीरसागर : बीडमधून शिवसेना उमेदवार

8. दिलीप सोपल : बार्शी, सोलापूरमधून शिवसेना उमेदवार

9. भास्कर जाधव : गुहागर, रत्नागिरीमधून शिवसेना उमेदवार

10. अजित पवार : राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा. परंतु राष्ट्रवादीकडूनच मैदानात

इतर पक्षांतील या आमदारांचेही पक्षांतर

1. विलास तरे (बहुजन विकास आघाडी) : बोईसर, पालघरमधून शिवसेना उमेदवार

2. शरद सोनवणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) : जुन्नर, पुण्यातून शिवसेनेने दिली विधानसभेची उमेदवारी

3. हर्षवर्धन जाधव (शिवसेना) कन्नड, औरंगाबाद, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून मैदानात. यापूर्वी २०१९ ची लाेकसभाही लढवली होती.

X
भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी अध्यक्ष बागडे यांना औरंगाबादेत चक्क दुचाकीवरून धावपळ करावी लागली.भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी अध्यक्ष बागडे यांना औरंगाबादेत चक्क दुचाकीवरून धावपळ करावी लागली.