आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- देशातील टॅक्स कलेक्शनबाबत रायटर्स या वृत्तसंस्थेने आज(शुक्रवार) एक रिपोर्ट जारी केली आहे. या रिपोर्टनुसार, दोन दशकांत पहिल्यांदाच भारत सरकारला कार्पोरेट आणि इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये घट होण्याचा सामना करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला 31 मार्च 2020 पर्यंत 13.5 लाख कोटी रुपये डायरेक्ट टॅक्स कलेक्शनची आशा आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत 17 % जास्त आहे.
रिपोर्टनुसार, मागणीच्या कमकरतेमुळे कंपन्यांवर गुंतवणूक आणि नोकरभरती करण्याचा दबाव आहे. यामुळे सरकारला या आर्थिक वर्षात फक्त 5% नफा मिळण्याची शक्यता आह, जो मागील 11 वर्षातील सर्वात कमी नफा असेल. सीनियर टॅक्स अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, टॅक्स डिपार्टमेंट 23 जानेवारीपर्यंत 7.3 लाख कोटी रुपयेच जमा करू शकला आहे. हे पैसे मागच्या जानेवारी महिन्यात जमा केलेल्या पैशांच्या 5.5% कमी आहेत.
यावेळेसचे टॅक्स कलेक्शन मागच्या वर्षीपेक्षा कमी असेल
रिपोर्टनुसार, पहिल्या तीन क्वार्टरमध्ये कंपन्यांकडून अॅडवांसणध्ये टॅक्स जमा केल्यानंतर अधिकारी शेवटच्या तीन महिन्यात 30-35% टक्क्यांची वाढ गृहित धरुन चालतात. पण, आठ सीनियर टॅक्स अधिकाऱ्यांचे माणने आहे की, कितीही प्रयत्न केला तरी यावेळेस टॅक्स कलेक्शन 11.5 लाख कोटींपेक्षा कमीच असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.