आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साहेबराव' वेदनामुक्त; पुन्हा डरकाळी फाेडणार; जगात प्रथमच वाघाला कृत्रिम पंजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- साहेबराव कधी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची शान हाेता. त्याच्या डरकाळीने सर्व जंगल थरथरत हाेते. परंतु अाज डरकाळीच्या जागी वेदनांनी त्याचा जीव पिळवटून निघत अाहे. नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ९ वर्षीय वाघाची भाषा समजणे मानवाच्या आवाक्यातील नाही. परंतु त्याच्या वेदना डाेळ्यांनी सहज पाहू शकताे. त्याला एक पंजा नाही. अाता सन २०१९ मध्ये त्याला कृत्रिम पंजा लावण्यात येणार अाहे. जगात प्रथमच वाघाला कृत्रिम पंजा लावला जाणार अाहे.

 

साहेबराव व त्याचा भाऊ सन २००८ मध्ये पलसगावात लावलेल्या एका ट्रॅपमध्ये फसले हाेते. या जाळ्यात साहेबरावच्या भावाचा मृत्यू झाला. साहेबराव वाचला. परंतु त्याचा पाय कापावा लागला. त्याच्या पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे त्याला निराेमा हा अाजार झाला. मागील दहा वर्षांपासून कापलेल्या पायाचा वेदना ताे सहन करत अाहे. अाता जगातील डॉक्टर त्याची वेदना दूर करण्यासाठी चर्चा करत अाहेत. नागपूरचे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुश्रुत बाभूळकर त्याला कृत्रिम पंजा लावण्यासाठी प्रयत्न करत अाहेत. नवीन वर्षात साहेबरावची न्यूरोमा अाजारापासून सुटका होईल, अशी अपेक्षा अाहे. या वर्षी जानेवारी महिन्यात डाॅ.सुश्रुत बाभूळकर गाेरेवाडे रेस्क्यू सेंटरमध्ये पाेहोचले. तेथेच त्यांचे लक्ष पिंजऱ्यातील साहेबराववर गेले. ती पहिली भेट अजूनही डाॅ.बागूळकर विसरू शकले नाहीत. ते म्हणाले, ' साहेबराववर जेव्हा माझी नजर गेली तेव्हा ताे राॅयल किंगप्रमाणे रुबाबात बसला हाेता. याेगायाेग पाहा, मला पाहताच ताे अचानक उभा राहिला. तीन पायांनी लंगडत माझ्याकडे अाला. मी यापूर्वी कधीही जंगलाच्या राजाला इतका असहाय पहिले नाही. मी त्याच्या डाेळ्यात पाहू लागलाे.

 

ताे मला काही सांगत अाहे, असे मला वाटले. अचानक त्याचा कापलेला पाय दिसला. मला खूप वाईट वाटले. तेव्हाच विचार केला, त्याला या वेदनांपासून मुक्ती मिळवून देईन. साहेबरावची पूर्ण माहिती घेतल्यावर मी त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.' वन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर डाॅ.बाभूळकर व त्यांच्या टीमने त्याची तपासणी केली. त्याला न्यूरोमा झाल्याचे स्पष्ट झाले. डाॅ. बाभूळकर यांनी जगभरातील तज्ज्ञ डॉक्टर व संस्थांशी संपर्क साधून माहिती मिळवली. प्राण्यांमध्ये कृत्रिम पाय लावण्याचे प्रयाेग फक्त कुत्रा, मांजर, हत्तीपर्यंत मर्यादित हाेते. कोणत्याही वाघाला कृत्रिम पाय लावल्याचे उदाहरण अजून तरी समाेर अाले नाही. माहिती मिळवण्यात काही महिने गेले. त्यादरम्यान साहेबरावच्या पायाचे माप घेतले गेले. ही माहिती सिलिकाॅनने कृत्रिम पाय बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांना पाठवण्यात अाली.

 

बातम्या आणखी आहेत...