आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच नवीन नियम : चेंडू फिल्डरच्या हेल्मेटला लागून उसळला, तर फलंदाज हाेऊ शकेल झेलबाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गत वेळचा वर्ल्डकप २०१५ मध्ये झाला हाेता. तेव्हापासून आतापर्यंत आयसीसीने क्रिकेटशी जुळलेल्या अनेक लहान-माेठ्या नियमांमध्ये बदल केले. हे सर्व नव्याने तयार केलेले नियम हे वनडेत लागू आहेत. मात्र, यंदा प्रथमच विश्वचषकादरम्यान यांची अंमलबजावणी केली जाईल. आयसीसीने आतापर्यंत वर्ल्डकपसारख्या मल्टिनॅशनल स्पर्धेदरम्यान या नियमांची कधीही पडताळणी केली नाही. आता इंग्लंड आणि वेल्समध्ये गत काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या नियमांची चाचणी केली जाईल. 

 

त्यामुळे या नव्या नियमांबद्दलची ही माहिती आपल्याला विश्वचषकादरम्यान महत्त्वाची ठरेल. फिल्डरच्या (पाॅइटवरील) हेल्मेटवर लागून स्टम्पला लागला किंवा क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल गेल्यास फलंदाज बाद देण्यात येईल. बॅट वा ग्लोव्हजला चेंडू लागल्यानंतर बाद देण्यात येत हाेते. आता हँडल द बाॅलवर नाॅटआऊट असेल.  स्टम्पवर आदळण्याच्या स्थितीत असलेला चेंडू हाताने फलंदाज राेखू शकेल.


३० षटकांपर्यंत दाेन्ही बाजूंनी वेगवेगळे चेंडू
वनडे सामन्यात आता दाेन्हीकडून वेगवेगळ्या चेंडूंवर सामना खेळवला जाताे. सुरुवातीच्या ३० षटकांपर्यंत दाेन चेंडूंचा वापर केला जाताे. उर्वरित २० षटकांसाठी एकच चेंडू वापरला जात हाेता.


गाेलंदाज एका षटकात दाेन बाउन्सर टाकणार 
आतापर्यंत वनडेत एका षटकात एकाच बाउन्सरचा नियम हाेता. आयसीसीने यात बदल करून ही संख्या दुप्पट केली. म्हणजेच आता काेणताही गाेलंदाज एका षटकात दाेन बाउन्सर टाकू शकेल. यातून फलंदाजाच्या बाजूने झुकणाऱ्या बाजूला संतुलित केले जाणार आहे.

 

इतर नवीन नियण जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......