आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In The World, Diamonds Found In Diamonds Can Be Up To 80 Million Years Old

जगात असे पहिल्यांदा घडले, हिऱ्यामध्ये मिळाला हीरा, हा 80 कोटी वर्षे जुना असू शकतो 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को : जगात पहिल्यांदा हिऱ्यामध्ये हिरा मिळाला आहे. रशियामध्ये सायबेरियाच्या खनन कंपनी अलरोसा पीजेएससीने शुक्रवारी ही महिती दिली. अलरोसाने आपल्या वक्तव्यात सांगितले, "यकुशियाच्या न्यूरबा खाणीमध्ये मिळालेला हा हीरा 80 कोटी वर्षे जुना असू शकतो."

याची किंमत 60 मिलियन डॉलर (सुमारे 426 कोटी रुपये) एवढी आहे. याला रशियाची पारंपरिक बाहुली 'मॅट्रीओशका' सारखे म्हणाले जात आहे. याचे वजन 0.62 कॅरेट आहे, मात्र याच्या आतल्या हिऱ्याचे वजन 0.02 कॅरेट आहे.  

हीरा प्रकृतीची एक अनोखी रचना आहे...  
अलरोसाच्या 'रिसर्च अँड डेव्हलपमेंट जियोलॉजिकल एंटरप्राइज' चे उपनिदेशक ओलेग कोवलचुक म्हणाले, "वैश्विक हिऱ्याच्या खाणीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत याप्रकारचा हीरा नाही मिळाला. ही वास्तवात प्रकृतीची एक अनोखी एक रचना आहे. सामान्यतः काही मिनरल्स कॅव्हिटी न बनता दुसऱ्यांद्वारे प्रस्थापित केले जाते."

बातम्या आणखी आहेत...