आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time Ishaan Ananya Sharing A Screen Together, The First Look Of The Movie 'Khali Pili' Released

पडद्यावर पहिल्यांदा दिसेल ईशान-अनन्याची जोडी, 'खाली पीली' चित्रपटाचा फर्स्ट लुक आला समोर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ईशान खट्टर आणि अनन्या पांडे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करणार आहेत. त्यांचा चित्रपट 'खाली पीली' चे फर्स्ट लुक पोस्टर समोर आले आहे. 'सुल्तान' आणि 'भारत' यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने हे ट्विटरवर शेअर करत लिहिले आहे. "हम पर भगवान का आशीर्वाद बना रहे। एक डेढ़ शाणा, एक आइटम, एक टैक्सी और एक रात की कहानी। अपुन ला रहे हैं 2020 की सबसे रापचिक मूवी।।"
 

11 सप्टेंबरपासून फ्लोअरवर येणार आहे चित्रपट... 
'खाली पीली' चे शूटिंग 11 सप्टेंबरपासून सुरु होईल. मकबूल खान हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. तर अली अब्बास जफर या चित्रपटातून प्रोडक्शनमध्ये पाऊल टाकत आहे. त्याच्या ट्वीटनुसार, झी स्टूडियोज आणि हिमांशु मेहरादेखील प्रोडक्शनमध्ये सामील होणार आहेत. हा चित्रपट 12 जून 2020 ला रिलीज होणार आहे.  
 

मीरा नायरच्या सीरीजमध्ये दिसेल ईशान... 
ईशान डायरेक्टर मीरा नायरच्या अपकमिंग सीरीजमध्ये दिसणार आहे. जी विक्रम सेठची कादंबरी 'अ सूटेबल बॉय' वर आधारित असेल. यामध्ये त्याच्यासोबत तब्बू आणि तान्या मानिकतलादेखील दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ही सीरीज 6 पार्ट्समध्ये बीबीसी वनवर टेलीकास्ट केली जाईल.  
 
अनन्याबद्दल बोलायचे तर तिने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' चित्रपटातून डेब्यू केला आहे. सध्या ती मुदस्सर अजीजच्या दिग्दर्शनात 'पती पत्नी और वो' चे शूटिंग करत आहे. जो पुढच्यावर्षी 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. 

बातम्या आणखी आहेत...