Home | Business | Auto | For the first time, the vendor and cabin electric truck ran on the road

प्रथमच विनाचालक व केबिनचा इलेक्ट्रिक ट्रक रस्त्यावर धावला, यात थ्रीडी सेन्सर, ३६० अंश फिरणारे कॅमेरे व रडार बसवले आहेत

वृत्तसंस्था | Update - May 18, 2019, 12:25 PM IST

ताशी ८५ किमी वेग, ५ च्या स्पीडने चाचणी, ट्रकची संपूर्ण सिस्टिम ५जी नेटवर्कशी कनेक्ट ठेवली, लवकरच येणार बाजारात

  • For the first time, the vendor and cabin electric truck ran on the road

    स्टॉकहोम - स्वीडनमधील स्कँडनिव्हियाच्या रस्त्यावर विनाचालक व केबिनलेस इलेक्ट्रिक ट्रकमधून प्रथमच माल वाहतूक करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर लवकरच याची कमर्शियल लाँचिंग होईल. यात ३डी सेन्सरने सुसज्ज असे ३६० डिग्री फिरणारे कॅमेरे व रडार ठेवले आहेत. ट्रकची संपूर्ण सिस्टिम ५ जी नेटवर्कच्या माध्यमातून कनेक्ट राहते. ट्रकची निर्माती कंपनी डीबी शंकर यांनी गुरुवारी सांगितले, इलेक्ट्रिकवर चालणारा हा जगातील पहिला ट्रक आहे. या ट्रकला औद्योगिक क्षेत्रातील एका वेअरहाऊस व टर्मिनलदरम्यान चाचणीसाठी डिसंेबर २०२० पर्यंतचा परवाना दिला आहे. सध्या ताशी ५ या वेगाने चाचणी सुरू आहे. एनव्हीडिया निर्मित एका स्वयंचलित ड्रायव्हिंग प्लॅटफाॅर्मचा ट्रकमध्ये वापर होतो आहे.

    इन्फोसिस, ओला आणि टाटा या दिग्गज कंपन्यांचेही या दिशेने कार्य

    गुगलने सर्वप्रथम विनाचालक कारची लाँचिंग केली आहे. भारतात इन्फोसिस ओला, टाटासह देशातील अनेक कंपन्या या दिशेने काम करत आहेत. टेक्नॉलॉजी यशस्वी ठरल्यास रस्त्यावर होणारे अपघात व वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.

Trending