आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजांची तीन द्विशतके

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - सलामीवीरच्या नव्या भूमिकेत प्रचंड फाॅर्मात असलेल्या राेहित शर्माने (२१२) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीचा पहिला डाव गाजवला. त्याने आपल्या कसाेटी करिअरमधील सर्वाेत्तम  खेळी करताना शानदार द्विशतक साजरे केले. राेहितचे द्विशतक आणि अजिंक्य रहाणेच्या (११५) शतकी खेळीच्या बळावर यजमान टीम इंडियाने आपला पहिला डाव ९ बाद ४९७  धावांवर घाेषित केला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाची दिवसअखेर चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे टीमने पहिल्या डावात २ बाद ९ धावा काढल्या. आता टीमचा हमजा (०) आणि कर्णधार डुप्लेसिस (१) मैदानावर खेळत आहेत.  भारताकडून माे. शमी आणि उमेश यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली. सलग दुसऱ्या दिवशी अंधूक प्रकाशाचा फटका  सामन्याला बसला. त्यामुळे रविवारी ६३.३ षटकांचा  खेळ हाेऊ शकला. 

पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताच्या फलंदाजांनी तीन  द्विशतके साजरी केली आहेत.  मालिकेतील सलामीच्या कसाेटी सामन्यात भारताच्या युवा फलंदाज मयंक अग्रवालने द्विशतकी खेळीचा पराक्रम गाजवला. हाच द्विशतकी खेळीचा कित्ता कर्णधार काेहलीने  पुणे येथील दुसऱ्या कसाेटीत गिरवला. हीच खेळीची लय कायम ठेवताना आता राेहितने रांचीच्या मैदानावर मालिकेतील तिसऱ्या कसाेटीत द्विशतक साजरे केले.
 

उमेशच्या १० चेंडूंत ३१ धावा नाेंद; कसाेटी इतिहासात वेगवान खेळी
नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या वेगवान गाेलदंाज उमेश यादवने विक्रमी खेळी केली. त्याने १० चेंडूंचा सामना करताना ३१ धावा काढल्या. यासह त्याने ३१० च्या स्ट्राइक रेटने कसाेटीच्या इतिहासात सर्वात वेगवान खेळीचा पराक्रम गाजवला. याच खेळीदरम्यान त्याने पाच उत्तंुग षटकारही ठाेकले.  कसाेटीच्या इतिहासात एका डावात ३० पेक्षा अधिक धावा काढण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत उमेश यादव हा अव्वल ठरला. त्याचा यासाठीचा  स्ट्राइक रेट अव्वल ठरला. यापूर्वी न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने २००४  मध्ये पाक संघाविरुद्ध ११ चेंडूंत  नाबाद ३१ धावांची खेळी केली हाेती.

भारताचे मालिकेत ४७ षटकार, नवा विक्रम नाेंद 
टीम इंडियाने घरच्या मैदानावरील या  मालिकेत उत्तंुग षटकारांचा विक्रम नाेंदवला. संघाने या मालिकेत आतापर्यंत ४७ षटकारांची नाेंद केली. यासह एका मालिकेत सर्वाधिक षटकारांचा नवा विक्रम संघाच्या नावे नाेंद झाला.
 

घरच्या मैदानावरील सरासरीमध्ये राेहितने टाकले डाॅनलाही मागे
रोहितने आतापर्यंत घरच्या मैदानावर १८ डावात ९९.८४ च्या सरासरीने १२९८ धावा काढल्या. यामध्ये ६ शतकांसह ५ अर्धशतकांचा समावेश आहे. हाेम ग्राउंडवर १ हजार धावांची विक्रमी खेळी करणाऱ्यात राेहितची सरासरी ही डॉन ब्रॅडमॅनपेक्षा सरस ठरली. त्यांच्या नावे  ९८.२२ च्या सरासरीने ४३२२  धावा काढल्या.

रोहितचे ५० षटकार पूर्ण, पाकच्या आफ्रिदीनंतर सर्वात वेगवानची नाेंद
> रोहितने कसाेटीत ५० षटकार पूर्ण केले.  त्याने ५१ डावांत हा पराक्रम गाजवला.  यामध्ये राेहित पाकच्या आफ्रिदीनंतर (४६ डाव) सर्वात वेगवान  खेळी करणारा ठरला. 
> रोहितच्या मालिकेत ५२९ धावा झाल्या आहेत. ताे  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत ५००+ धावा काढणारा चाैथा फलंदाज  ठरला. क्लार्क (५७६), वॉर्नर (५४३) व पाँटिंगने (५१५) अशी खेळी केली. 


रोहितसह चार फलंदाजांच्या नावे वनडे व  कसाेटीत द्विशतकी खेळीची ना
ेंद 
> रोहित कसाेटी व वनडेत द्विशतक साजरे करणारा भारताचा तिसरा आणि जगातील चाैथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी दाेन्ही फाॅरमॅटमध्ये द्विशतकी खेळीचा पराक्रम  सचिन, सेहवाग, विंडीजच्या क्रिस गेलने गेला आहे.
> १४ वर्षांनंतर भारतीय ओपनरच्या मालिकेत ५०० + धावा : रोहितने एकाच मालिकेत सलामीवीरच्या भुमिकेत ५०० पेक्षा अधिक धावा काढल्या, अशी कामगिरी करणारा ताे भारताचा पाचवा सलामीवीर ठरला. १४ वर्षानंतर भारतीय सलामीवीराने ही खेळी केली.