आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् लैलाला मिळाला License: पाकिस्तानात प्रथमच ट्रान्सजेंडरला मिळाला वाहन परवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - जगभरात कट्टरपंथी राष्ट्र म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानचा एक उदार चेहरा मंगळवारी समोर आला आहे. या देशात प्रथमच एका तृतीयपंथियाला वाहन परवाना देण्यात आला. इस्लामाबादचे पोलिस प्रमुखांनी आपल्या हस्ते लैला अली नावाच्या ट्रान्सजेंडरला लायसन्स जारी केला. डॉनच्या वृत्तानुसार, लैला अली गेल्या 10 वर्षांपासून विना वाहन परवाना ड्रायव्हिंग करत होती. यावेळी आपल्याला काय-काय सहन करावे लागले याची आपबिती सुद्धा तिने माध्यमाशी संवाद साधताना मांडली आहे.


परवाना मिळाल्यानंतर लैला अलीने पाकिस्तानी मीडियाशी संवाद साधला. तिने सांगितल्याप्रमाणे, गेल्या 10 वर्षांपासून ती पाकिस्तानात वाहन परवाना नसतानाही ड्रायव्हिंग करायची. या दरम्यान तिला लोकांसह पोलिसांनी देखील खूप त्रास दिला. वेळोवेळी तिचे वाहन अडवून लायसन्सची विचारणा केली जायची. अनेकवेळा ती ट्रान्सजेंडर असल्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे, तर पोलिस सुद्धा तिची थट्टा-मस्करी करायचे. तिने आपल्या या समस्या इस्लामाबाद ट्रॅफिक पोलिस प्रमुखांसमोर ठेवल्या. त्यांनीच लैलाला परवाना देण्याचे आश्वस्त केले आणि आपले आश्वासन मंगळवारी (27 नोव्हेंबर) पूर्ण देखील केले.


संसदेने मे महिन्यात मंजूर केला हा कायदा
पाकिस्तानात सद्यस्थितीला जवळपास 5 लाख ट्रान्सजेंडर राहतात. आतापर्यंत त्यांना मतदान किंवा ओळख पत्र ठेवण्याचा देखील अधिकार नव्हता. परंतु, याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तान सरकारने एका कायद्याला मंजुरी दिली. तृतीय पंथियांना समान अधिकार आणि नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच कायद्यानुसार, लैला अली हिला वाहन परवाना देण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...