आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time, Wears Pink On Red Carpet, Kangana Said, 'This Is Not My Color, It's My Risk'

कान्स फिल्म फेस्टिवल 2019 : पहिल्यांदा पिंक घालून रेड कार्पेटवर चालली कंगना, बोलली - 'हा माझा कलर नाही, माझी रिस्क आहे' 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोटने शुक्रवारी कान्समध्ये यावर्षीचा दुसरा अपीयरेंस दिला. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कंगना रनोटच्या दुसऱ्या दिवसाच्या लुकचे फोटोज शेयर केले आहेत आणि आणि एकासोबत लिहिले आहे, "जागा असे, जसे की तुम्ही रेड कार्पेटसाठीच बनलेले आहात." कंगनाने रेड कार्पेटसाठी मायकल सिंकोचा पिंक कोट्यूर गाउन परिधान केला होता. सोबतच आपल्या केसांना तिने क्राउन ब्रेड लुक दिला आणि न्यूड मेकअप केला होता. तसेच रेड कार्पेटनंतर झालेल्या पार्टीसाठी कंगना ऑस्ट्रेलियाई फॅशन डिजाइनर टोनी मैटिसेव्स्कीच्या एलीगंट व्हाइट गाउनमध्ये दिसली.  

 

 

रेड कार्पेटसाठी पहिल्यांदा घातला पिंक...  
कंगनाने रेड कार्पेट अपीयरेंसदरम्यान मीडियासोबत बोलताना सांगितले की, "मी कधीच कोणत्या रेड कार्पेटसाठी पिंक नाही घातला. हा माझा मेरा कलर नाहीये. त्यामुळे मी केवळ एवढेच म्हणू इच्छिते की, मी रिस्क घेतली आहे." कंगना पुढे म्हणाली, "हेयर खूप रोमँटिक आणि रीगल आहेत. मेकअपदेखील खूप सॉफ्ट आहे. यापूर्वी कधीच मी इतका सॉफ्ट लुक घेतला नव्हता." कंगनाचे कान्समध्ये हे दुसरे वर्ष आहे.  

 

 

कंगनाने केले प्रसून जोशीचे कौतुक...  
बुधवारी जेव्हा कंगनाने इंडिया पवेलियनमध्ये स्पीच दिली तेव्हा तिने चित्रपट 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' ला डायरेक्ट करण्याचा अनुभव शेयर केला होता. कंगनाने सेंसर बोर्ड अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशीचे कौतुक करत सांगितले, "सुरुवातीला चित्रपटाच्या डायरेक्शनसाठी थोडी साशंक होते. आणि याबाबत मी प्रसून सरांना सांगितले. मला सांगायचे आहे की, जर पुढे मी मोठी फिल्ममेकर बनले तर त्याचे कारण प्रसून सरच असतील."

 

 

कंगनाने यामागचे कारण सांगितले, "तेच (प्रसून) होते, जे म्हणाले होते की, 'ती चित्रपट दिग्दर्शित करू शकते. तिला करू द्या.' जेव्हा मी त्यांना विचारले की, त्यांना असे का वाटते तर ते म्हणाले, 'मी अनेक दिग्दर्शकांना पहिले आहे आणि मला तुझ्यातही तेच दिसते. तू हे करू शकतेस." झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मणिकर्णिका' ही डायरेक्टर म्हणून कंगनाची पहिली फिल्म आहे, जी जानेवारीमध्ये रिलीज झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...