आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहानग्या जेरेडबद्दल महेश भट्ट म्हणाले 'जेरेड फक्त एक स्टार नव्हे तर रॉकस्टार आहे..'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : महेश भट्ट नेहमीच नवीन प्रतिभेला संधी देतात. त्यांच्या आगामी मालिकेत ‘दिल जैसे धड़के धड़कने दो’ मध्ये ६ वर्षाचा जेरेड अल्बर्ट सॅवेल, युगची भूमिका साकारात आहे. या मालिकेतून जेरेड आणि हिरवा त्रिवेदी आपल्या करिअरची सुरुवात करणार आहेत. मालिकेची कथा या दोघांच्या भाग्यावर आधारित आहे. जेरेडचे पात्र एक टिपिकल मुलगा आहे. तो खोडकर असतो. आपल्या मित्रांसोबत वेळ घालवणे त्याला आवडते. महेश भट्टच्या टीव्ही मालिकेतून टीव्हीवर सुरुवात करणाऱ्या जेरेडने आपली प्रतिभा अभिनयापर्यंतच मर्यादित ठेवली नाही. तर जेरेडने शोमध्ये रॅपदेखील केले. यात त्याने रामायणची कथा मजेशीर पद्धतीने सांगितली. याविषयी भट्ट सांगतात, स्टारचा मी एका किलोमीटरवरुनही वास घेऊ शकतो. जेरेड फक्त एक स्टार नाही तर तो एक रॉकस्टार आहे. युगच्या पात्रात तो एकदम फिट बसला आहे. तो एक बालकलाकार नव्हे तर निरागस बालक आहे. अभिनयात त्याचे समर्पण मोठ्यांना लाजवेल असे आहे. ते पाहून मी चकित झालो आहे.