आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या जागतिक विक्रमासाठी २०० पाणबुड्यांनी तब्बल २७० मीटर खोलवर केले डायव्हिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीला - फिलिपाइन्समध्ये शुक्रवारी फ्री डायव्हिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यात २०० पाणबुड्यांनी फिलिपिनो सरोवरात सुमारे २७० मीटर खोलवर डायव्हिंग केले. डायव्हिंगचा उद्देश जागतिक विक्रम करण्याचा होता. फेस्टिव्हलच्या फ्री-डायव्हिंगमध्ये १३२ पुरुष व ६८ महिलांचा सहभाग होता. फेस्टिव्हलचे हे दहावे वर्ष होते. डायव्हिंगदरम्यान पाणबुड्यांनी पाण्यात आपल्या कलेचे प्रदर्शन केले. यात ऑस्ट्रेलियातील जागतिक विक्रमात नोंद झालेला अॅडम स्टर्न यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी फ्री डायव्हिंगचे रेकॉर्ड न्यूझीलंडमध्ये केेले होते. दरम्यान अॅडम यांनी एका श्वासात पाण्यात २६५ मीटर खोलवर जाऊन आले. आयोजकांनी फेस्टिव्हलच्या एक महिन्यापूर्वीपासूनच तयारी सुरू केली होती. यासाठी नोंदणीही केली होती. 

बातम्या आणखी आहेत...