आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेदरलँड : आर्मेनियन लोक देशाबाहेर काढण्यापासून रोखण्यासाठी चर्चमध्ये चालली २३२७ तास प्रार्थना 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅम्सटर्डम - गेल्या ९ वर्षंापासून नेदरलँडमध्ये राहत असलेल्या अार्मेनियन लोकांना देशाबाहेर काढण्यापासून रोखण्यासाठी बीथल चर्चमध्ये सलग २३२७ तास प्रार्थना करण्यात आली. जनतेच्या रेट्यापुढे सरकारने शरणागती पत्करली. निर्वासितांच्या सर्व अर्जांवर पुनर्विचार करण्याची घोषणा सरकारने केली. अार्मेनियातील ५ सदस्य असलेल्या कुटुंबास २५ ऑक्टोबर रोजी देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु या परिवारास देश सोडून जाण्याची इच्छा नव्हती. २६ ऑक्टोबर रोजी हेग येथील बीथल चर्चमध्ये त्यांना आश्रय देण्यात आला. दरम्यान, शेकडो पाद्री व नागरिकांनी प्रार्थना सुरू केली. डच सरकारने म्हटलेे, या परिवाराने राजकीय आश्रय घेतला होता. पण त्यांना पुढे मुदतवाढ दिली नव्हती. त्यामुळे त्यांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. 

 

प्रार्थनेच्या काळात पोलिसांना चर्चमध्ये प्रवेशबंदी 
नेदरलँडमध्ये नियम आहे की, प्रार्थना सुरू असेल तर चर्चमध्ये पोलिसांना प्रवेश करता येत नाही. अार्मेनियन परिवारास वाचवण्यासाठी या नियमाचा आधार घेण्यात आला. दरम्यान, पोलिसांनाही चर्चमध्ये प्रवेश करता आला नाही. ते त्यांना अटक करू शकले नाहीत. यासाठी लोकांनी अखंड प्रार्थना सुरू ठेवली. 

बातम्या आणखी आहेत...