आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई होणार कमी : या कारणामुळे पेट्रोलचे दर होणार 70 रूपयांपेक्षा कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - भारतासाठी चांगली बातमी आहे. क्रूड ऑइलची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती मागील एका वर्षाच्या निच्चांकीवर आल्या आहेत. याचा लाभ ग्राहकांनी मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यामुळे भारतामध्ये पेट्रोलचे दर परत एकदा 70 रूपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. 

 

> जागतिक अर्थव्यवस्थेतेतील मंदीचे वातावरण आणि अमेरिकेच्या उत्पादनातील वाढ यामुळे क्रूड ऑइलच्या किंमती खाली घसरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 11 टक्क्यांनी घसरून 60 डॉलर प्रती बॅरेल पर्यंत आली आहे. अमेरिकी लाइट क्रूड वेस्ट टेक्सास इंटमिडीएट(डब्ल्यूटीआई) चे दर मागील एका आठवड्यात जवळपास 10.70 टक्क्यांनी घसरून 50 डॉलर प्रती बॅरेलपर्यंत आले आहे. 

 

यामुळे कमी झाल्या किंमती 

> एंजल ब्रोकिंग हाउसचे ऊर्जा विशेषज्ञ अनुज गुप्ता यांनी सांगितले की, अमेरिकेतील कच्च्या तेलाची वाढलेली साठवणूक आणि जागितक स्तरावरील कमी झालेली मागणी यामुळे ही मोठी घसरण झाली आहे. क्रूड ऑइलचा वाढलेला जागतिक पुरवठा आणि घटलेली मागणी यामुळे गेल्या सात आठवड्यांपासून बाजारातील तेलाच्या किमती कोसळल्या आहेत. 3 ऑक्टोबरनंतर ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 30% आणि डब्ल्यूटीआयचे दर 33% कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

> नुकत्याच झालेल्या क्रूड ऑइलच्या किमतीतील घसरणीनंतर 6 डिसेंबर रोजी व्हिएन्नामधील पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) च्या संघटनेच्या बैठकीत तेलाचा पुरवठा कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याआधी प्रमुख तेल उत्पादक देश सौदी अरेबियाने गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा याची पुनरावृत्ती केली आहे.

 

सौदी अरेबिया कच्च्या तेलचा पुरवठा कमी करण्याची शक्यता

> केडिया कमोटिडीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या दराने मागील वर्षीचा निच्चांक गाठला आहे. यामुळे सौदी अरेबियाचा ओपेक देशांना करण्यात येणाऱ्या पुरवठ्यामध्ये दररोज 14 लाख बॅरेलची घट करण्याचा प्रयत्न असेल. पण ह्याची अंमलबचावणी होण्याची शक्यता कमी आहे. पण असे झाल्यास ओपेक देशांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण व्हेनेझुएला देश आधीपासूनच महागाईशी लढत आहे. अशात तेल उत्पानामध्ये होणाऱ्या कपातीचा दबाव सहन करू शकणार नाही. 

 

किंमती कमी होण्यामागे अमेरिका आणि चीन आहेत कारणीभूत

> पुढे ते म्हणाले की, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामुळे मंदीचे सावट वाढत आहे. म्हणूनच पार पडणाऱ्या जी-20 बैठकीवर संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजाराची नजर असणार आहे. यामध्ये अमेरिका आणि चीन दोघेही सहभाग घेणार आहेत. सध्या व्यवसायाच्या तणावामुळे दोन्ही देशांमधील परस्परसंवादाबद्दल दुविधा स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या इराणवरील प्रतिबंधामुळे गेल्या महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 86.74 डॉलर झाला होता. तेल पुरवठ्यातील गेल्या चार वर्षांतील तो उच्चतम स्तर होता.

 

भारताला होणार फायदा

> भारतीय वायदा मार्केट मल्टी कमोडिटी (एमसीएक्स) एक्सचेंज वर शुक्रवारी डिसेंबरमधील पुरवठा वायदा करार मागील सत्रापेक्षा 216 रूपये म्हणजेच 5.65 टक्क्यांनी घसरून 3,607 रूपये प्रती बॅरलवर बंद झाला. यामुळे भारताला याचा फायदा होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...