आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आपल्याला या कारणासाठी आहे "पासवर्ड मॅनेजर"ची आवश्यकता 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पासवर्डचा सरळ संबंध हा लक्षात ठेवण्यासाठी असताे यात काही शंका नाही. मानवी मेंदूचा प्रयत्न हा या कटकटीपासून लांब राहण्याचा असताे. त्यामुळे जन्मतारीख, पेट नाव, भागीदाराचे नाव पासवर्ड बनतात. त्यावरही कडी म्हणजे एक अकाउंट जरी हॅक झाले तर हॅकर्सना पासवर्ड कितीही भक्कम केला असला तरी दुसऱ्याचे अकाउंट हॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. याचा विचार न करताच लाेक या पासवर्डचा उपयाेग सर्व वेबसाइटवर करतात. प्रत्येक वेबसाइटसाठी नावीन्यपूर्ण आणि कठीण पासवर्ड बनवणे, ताे लक्षात ठेवणे खराेखरच कठीण आहे. 

पासवर्ड मॅनेजरची गरज यासाठी 
युजर्स नेहमी आपले पासवर्ड नाेटपॅडवर लिहून सेव्ह करतात, परंतु हे खूप धाेकादायक आहे. या नाेटपॅडचे रूपांतर तुम्ही 'पासवर्ड मॅनेजर'मध्ये करू शकता. पासवर्ड मॅनेजरमध्ये तुमचे सर्व पासवर्ड सेव्ह हाेतात. हे पूर्णत: सुरक्षित, स्वयंचलित आणि खूप सुविधाजनकही आहे. जेव्हा तुम्ही नवीन अकाउंट सुरू करता किंवा पासवर्ड बदलता त्या वेळी मॅनेजर ताे पासवर्ड एकदम मजबूत बनवताे. अनेक प्रकरणांत हा क्रेडिट कार्ड क्रमांक, बँक खाते आणि अन्य माहितीचाही समावेश करताे आणि एकाच जागी स्टाेअर करताे. एखाद्या मजबूत पासवर्डच्या तुलनेत ही जागा जास्त सुरक्षित असते. अनेक मॅनेजर आपल्याला एक चांगला पासवर्ड बनवण्यासाठीही मदत करतात. तुम्हाला केवळ हा मास्टर पासवर्ड लक्षात ठेवावा लागताे. जेव्हा तुम्ही सेलफाेन वा काॅम्प्युटरद्वारे एखाद्या वेबसाइटवर लाॅग-इन कराल, त्या वेळी युजरनेमपासून ते पासवर्डपर्यंतची सर्व माहिती भरण्याचे काम हा मॅनेजर करेल. 
तनू एस, बंगळुरू 

चांगल्या पासवर्ड मॅनेजरमध्ये या गाेष्टी 
ऑटो फिल ऑप्शन सर्वच जण देतात, चांगला पासवर्ड मॅनेजर यापेक्षाही चांगले काम करताे. पासवर्ड तुम्ही अगाेदर वापरला असेल तर ते ताे तुम्हाला सांगताे. जर सरळ, साेपा पासवर्ड बनवला तर ताे सतर्क करताे. काही मॅनेजर तर तुमचे आॅनलाइन अकाउंट कधी हॅक झाले आणि तुमचा पासवर्ड कधी चाेरला हे सांगताे. काही अकाउंट्स तुम्ही कुटुंबाबराेबर शेअर करत असाल तर त्याची व्यवस्थाही चांगला पासवर्ड मॅनेजर करताे. 

प्रत्येक प्रकारचे पर्याय उपलब्ध 
पासवर्ड मॅनेजर तुमच्या प्रत्येक बजेटनुसार मिळतात. काही चांगले पर्याय माेफत मिळतात. परंतु सार्वजनिकदृष्ट्या त्यांच्या सेवा मर्यादित असतात. काही मॅनेजर्ससाठी वर्षभरासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. 

हेही लक्षात ठेवा 
मास्टर पासवर्ड तयार करताना ताे डिजिटली सेव्ह करू नका. एखाद्या कागदावर लिहून ताे तुमच्याकडे सुरक्षित ठेवणे सगळ्यात चांगले. कागदावर लिहिणे जुन्या फॅशनचे वाटले तरी यापेक्षा सुरक्षित दुसरे काही नाही.