आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भिलाई(छतीसगड)- येथील जयंती स्टेडियम परिसरात तरुणाचा मृतदेह आढळ्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. या गोष्टीची सूचना पोलिसांना मिळताच, पोलिसांनी स्टेडियमजवळचा संपूर्ण परिसर शोधला. तीन तासांच्या मेहनतीनंतर पोलिसांना तरुणाबद्दल माहिती मिळाली आणि पोलिस त्याच्या घरी पोहचले. घरात तरुण जिवंत असल्याचे पाहून पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील तरुणांचा एक ग्रुप टीक-टॉक व्हिडिओ बनवत होता. या व्हिडिओसाठी डी.गोविंद राव(26) नावाच्या तरुणाच्या चेहऱ्यावर लाल रंग लावण्यात आला होता. त्यानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याचा खून झाल्याची खोटी माहिती पसरवण्यात आली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी स्टेडियमचा परिसर शोधला पण तरुणाचा मृतदेह मिळाली नाही. तीन तासानंतर पोलिसांना घटना कळाली आणि त्यांनी तरुणाचे घर गाठले. तरुण सुखरुप असल्याचे पोलिसांनी कळताच त्यांनी तपास थांबवला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्याची चौकशी केली आणि त्याच्यावर कलम 151 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.