आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For Two Crore Rupees, The Imran Khan Government Allowed The Baharin's King To Hunt Of Birds

दोन कोटी रुपयांसाठी इम्रान खान सरकारने बहारीनच्या राजाला माळढोकची शिकार करण्यास परवानगी दिली

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : पाकिस्तानात इम्रान खान सरकार पुन्हा एकदा वादात सापडले आहे. कारण आहे - कतारनंतर बहारीनचे राजे शेख हमाद बिन सलमान अल खलिफा यांना सहकुटुंब पक्ष्यांची शिकार करण्यास मंजुरी देणे. शाही कुटुंबाला १००-१०० पक्ष्यांची शिकार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पाकिस्तानात संरक्षित असलेला होऊबारा बस्टर्ड (माळढोक) पक्षी दुर्मिळ यादीत आहे. त्याच्या शिकारीवर बंदी आहे. असे असतानाही शाही कुटुंबाला सरकारने शिकारीची परवानगी दिल्याने लोक नाराज आहेत.

इम्रान सरकारला या मुक्या पक्ष्यांच्या शिकारीच्या बदल्यात सुमारे दोन कोटी रुपये मिळतील. पाकिस्तानमध्ये पूर्व भागातील सरकारेही आखातातील इतर देशांच्या शाही कुटुंबांना माळढोकच्या शिकारीची परवानगी देत आलेले आहेत. इम्रान जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी अशा शिकारीला मंजुरी देणे हे राष्ट्रीय लज्जास्पद काम असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सिंध, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतातील सरकारांना शाही कुटुंबांच्या बडदास्तीसाठी विशेष नियम आणि परमिट जारी केले आहेत. राज्य सरकारांनी म्हटले की, शाही कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक प्रकारची सोय-सुविधा मिळाली पाहिजे.

पाकिस्तानमध्ये माळढोकला तलोरा म्हणतात. हिवाळ्यात हे पक्षी प्रवासी म्हणून येतात. लुप्त होण्याच्या मार्गावर असलेला हा प्रवासी पक्षी विविध आंतरराष्ट्रीय करारानुसार संरक्षित आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याच्या शिकारीवर बंदी आहे.

अरब लोकांच्या मते माळढोक अारोग्यासाठी उत्तम

अरबी देशांतील शाही कुटुंबांना माळढोकची शिकार करणे आवडते. याचे मांस आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असते व त्यात कामोत्तेजक गुणधर्म असतात, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे याच्या शिकारीसाठी ते दरवर्षी बलुचिस्तानात येतात.
 

बातम्या आणखी आहेत...