आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For Vegetarians A Company Creating Special Vegetarian Nutritious Eggs From Plant Materials

लवकरच शाकाहारी लोकांसाठी खास शाकाहारी अंड्यांची होणार निर्मिती, मुगडाळीपासून बनणार अंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- "संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे" असे म्हटले जाते. पण अंडे हे शाकाहारी आहेत की मांसाहारी यावरुन अनेक वाद आहेत. अंडे कोंबडी किंवा इतर पक्षी म्हणजेच सजीवांकडून मिळत असल्याने ते मांसाहारी असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो, तर काही जण दररोजच्या खाण्यात वापरल्या जाणाऱ्या अंड्यात गर्भ नसतो त्यामुळे ते शाकाहारी असल्याचे सांगतात. या वादामुळे अनेक शाकाहारी व्यक्तींना अंडे खाता येत नाही. पण आता लवकरच मुगाच्या डाळीपासून अंड्याची निर्मिती करण्यात येणार आहे. हे अंडे शाकाहारी असल्याने शाकाहारी व्यक्तींनाही खाता येतील.


एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका प्रसिद्ध नामांकित कंपनीने गेल्यावर्षी अंड्यासाठी पर्याय म्हणून मूग डाळीचा वापर केला होता. मागीलवर्षी या कंपनीने अमेरिकेतील बाजारात हे अंडे विक्रीस ठेवले होते. त्या ठिकाणी या अंड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कंपनी आता लवकरच भारतीय बाजारात मुगडाळीपासून बनवलेले शाकाहारी अंडे विक्रीस ठेवणार आहे.

 

अंड्यात प्रामुख्याने तीन भाग असतात. अंड्याचे कवच, पिवळा बलक आणि पांढरा भाग. यातील पांढऱ्या भागात प्रथिनं असतात, पिवळा बलकमध्ये कोलेस्ट्रॉल, फॅट्स आणि प्रथिने असतात. या सर्वांचा विचार करता अंड्यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने आणि फॉस्फरससारखे शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे मिळतात. यामुळे प्रत्येकाने दिवसाला एकतरी अंडे खावे असा सल्ला दिला जातो.

 

पण अंडे हे शाकाहारी आहेत का मांसाहारी याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात नाहीये. त्यामुळे शाकाहारी लोक सहसा अंडे खाणे टाळतात. या लोकांसाठी काही कंपन्या अंड्याला पर्याय शोधत आहे. काही वर्षांपूर्वी सोयाबीनच्या झाडापासूंन शाकाहारी अंड्याची निर्मिती केली गेली होती. हे अंडे दिसायला कोंबडीच्या अंड्याप्रमाणेच होते. पण याची चव थोडी वेगळी होती. या अंड्यातील पिवळा बलक हा वनस्पती तेल आणि काही विशिष्ट जेलपासून तयार करण्यात आला होता.