आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये मुख्यमंत्र्यांचा धनंजय मुंडेंवर निशाना, म्हणाले- 'तुमच्यासाठी आमचे आमदार सुरेश धसच पुरेसे आहेत...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे आकडे सांगतात, त्यांनी एकदा जाहीर चर्चेला यावं, असे आव्हान  धनंजय मुंडेंनी केले होते. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, धनंजय मुंडेंना चर्चेसाठी मी स्वतः, पंकजाताई किंवा प्रीतमताई यांची गरज नाही, त्यांना आमचे आमदार सुरेश धसच पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. 

देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत बीडमध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. जनतेला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली, शिवाय आपले बीड जिल्ह्यातील आमदार निवडून तर येणारच आहेत, पण राष्ट्रवादीची अवस्था अशी करा, की त्यांच्या तिकिटावरही पुन्हा कोणी निवडणूक लढवली नाही पाहिजे, असे म्हणत त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला.
 
राष्ट्रवादीने सुरुवातीला संघर्ष यात्रा काढली, पण त्यांच्यात संघर्ष करणारा एकही चेहरा नव्हता. त्यानंतर लोकसभेपूर्वी हल्लाबोल यात्रा काढली, जनतेने त्यांना निकालातून उत्तर दिले. आता आणखी एक यात्रा काढली आहे. पण जनताच त्यांना पुन्हा एकदा उत्तर देईल. पराभव झाल्यानंतर हे ईव्हीएमला दोष देतात. बारामतीत पवारांची लेक निवडून आली तर ईव्हीएमचा दोष नसतो, पण बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांची लेक निवडून आली तर ईव्हीएमचा दोष असतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

बातम्या आणखी आहेत...