आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Forbes : No Bollywood Actress In The Top 10 Highest Grossing Actresses List, Scarlett Is Second Time On The Top

फोर्ब्स : सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप 10 अभिनेत्रींमध्ये बॉलिवूडमधून एकही नाही, स्कारलेट दुसऱ्यांदा आहे टॉपवर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : अभिनेत्यांनंतर आता फोर्ब्सने जगातील टॉप 10 सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. मात्र यामध्ये एकही भारतीय अभिनेत्री आपली जागा बनवू शकलेली नाही. हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन सलग दुसऱ्यांदा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तिचे वार्षिक उत्पन्न 56 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 400 कोटी रुपये आहे.  
 

स्कारलेटच्या कमाईमध्ये झाली 141 कोटींची वाढ... 
मागच्यावर्षी स्कारलेटची कमाई 40.5 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 259 कोटी रुपये होती. या हिशेबाने तिच्या कमाई या वर्षभरात सुमारे 141 कोटी रुपये वाढली आहे. स्कारलेट यापूर्वी मार्वल स्टूडियोजचा चित्रपट 'अॅव्हेंजर्स : एन्डगेम' मध्ये दिसली होती, ज्या चित्रपटाने 2796 मिलियन डॉलर (सुमारे 19994 कोटी रुपये) एवढे कलेक्शन केले होते आणि जगातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला.  
 

ही आहे टॉप 10 अभिनेत्रींची लिस्ट... 

  क्रमांक          अभिनेत्री                      वार्षिक कमाई
 1 स्कारलेट जोहानसन 56 मिलियन डॉलर (सुमारे 400 कोटी रुपये) 
 2 सोफिया वरगारा 41.1 मिलियन डॉलर (सुमारे 294 कोटी रुपये) 
 3 रीज विदरस्पून      35 मिलियन डॉलर (सुमारे 250 कोटी रुपये)
 4 निकोल किडमन 34 मिलियन डॉलर (सुमारे 243 कोटी रुपये)
 5 जेनिफर एनिस्टन 28 मिलियन डॉलर (सुमारे 200 कोटी रुपये
 6 कॅली कूको 25 मिलियन डॉलर (सुमारे 179 कोटी रुपये) 
 7 एलिजाबेथ मॉस 24 मिलियन डॉलर (सुमारे 172 कोटी रुपये) 
 8 मर्गोट रॉबी 23.5 मिलियन डॉलर (सुमारे 168 कोटी रुपये)
 9 चार्लीज थेरोन 23 मिलियन डॉलर (सुमारे 164 कोटी रुपये)
 10 एलेन पॉम्पो  22 मिलियन डॉलर (सुमारे 157 कोटी रुपये)