Home | International | Other Country | forced-to-rape-in-misrata

गद्दाफिंच्या आदेशावरून 1 हजार महिलांवर बलात्कार, त्रिपोलीत ऐकू येताहेत स्फोटकांचे धमाके

agency | Update - May 27, 2011, 04:02 PM IST

विद्रोहींनी मिसराता ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा बलात्कारपीडीत महिला यौन संबंधी रोगाच्या भयाने तपासणीसाठी रुग्णालयात आल्या तेव्हा

  • forced-to-rape-in-misrata

    त्रिपोली/लंडन... मिसराता येथील एका रुग्णालयाच्या डॉक्टराने दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी 1 हजार महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे वृत्तात म्हटले आहे. संडे टाईम्सच्या पत्रकाराने बलात्काराचे व्हीडिआेज पाहिल्याचे म्हटले आहे. या व्हिडिआेज गद्दाफीच्या मृत आणि जिवंत सैनिकांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार सैनिकांना बलात्काराचे आदेश गद्दाफी यांनी दिले होते.
    दरम्यान बीबीसीनेही या वृत्ताची पुष्टी केली आहे. गद्दाफी समर्थकांनी महिला आणि अल्पवयीन मुलींवर सामूहिक कुकर्म केल्याचे पुरावे मिळाल्याचे बीबीसीने म्हटले आहे. विद्रोहींनी मिसराता ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा बलात्कारपीडीत महिला यौन संबंधी रोगाच्या भयाने तपासणीसाठी रुग्णालयात आल्या तेव्हा कुठे हा प्रकार जगासमोर आला.
    दरम्यान नाटो फौजांनी हल्ला तीव्र केल्याचे वृत्त असून गेल्या तीन दिवसांपासून त्रिपोली परिसरात स्फोटकांचा आवाज एकू येत असल्याचे वृत्त आहे. मात्र हल्ला नेमका कोणत्या भागावर चढविला जातोय याची माहिती मिळू शकली नाही.

Trending