आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचारशे रुपयांची 'फोर्ड कार' चौहान कुटुंबीयांसाठी बनली अनमोल ठेवा, डॉ. आंबेडकर फक्त एकदाच बसले होते कारमध्ये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीवेळी बाबासाहेब आंबेडकरांना रेल्वेस्टेशनहून महाविद्यालयापर्यंत घेऊन येण्यासाठी सुरेंद्रसिंह चौहान यांची 'फोर्ड कार' वापरण्यात आली होती. ही कार आता ७५ पेक्षा अधिक वर्षांची झाली आहे. चौहान यांनी फक्त साडेचारशे रुपयांमध्ये 'सेकंड हँड' खरेदी केली होती. केवळ बाबासाहेबांचा कारला स्पर्श झाल्यामुळे कार आता चौहान कुटुंबीयांसाठी अनमोल ठेवा झाला आहे. 


शासकीय दूध डेअरीमध्ये त्या वेळी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या संग्रामसिंह चौहान यांनी ही कार'स्टेट टॉकीज'चे हक्कामियाँ यांच्याकडून खरेदी केली होती. संग्रामसिंह यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेंद्रसिंह चौहान आता ८३ वर्षांचे आहेत. त्यांनीच वयाच्या सोळाव्या वर्षी बाबासाहेबांचे सारथ्य केले होते. 'मिलिंद'च्या उभारणीवेळी बाबासाहेब खूप थकलेले होते. संग्रामसिंह चौहान यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात काम केले आहे. त्यामुळे त्यांचा बी. एस. उपाख्य भाऊसाहेब मोरे यांच्याशी घनिष्ठ परिचय होता. भाऊसाहेब, एन. डी. पगारे आणि रुंजाजी भारसाखळे यांनीच त्यांना कार देण्यासाठी आग्रह केला होता. बाबासाहेब गाडीत बसणार म्हणून त्यांनीही लगेच होकार कळवून मुलगा सुरेंद्रसिंह चौहान यांना चालक म्हणून पाठवले होते. चौहान यांनी १९५१ दरम्यान साउंड सर्व्हिसचा व्यवसायदेखील सुरू केला होता. याच गाडीत लाऊडस्पीकर आणि माइक सभास्थानी घेऊन जात होते. बाबासाहेबांनी आमखास मैदानावर घेतलेल्या सभेत याच माइकवर भाषण दिले होते. 


पेट्रोल, डिझेल आणि पॉवरवर चालते कार 
गाडीची आत्तापर्यंत तीन राज्यांची 'पासिंग' बदलली आहे. त्यामध्ये हैदराबादेतील निझाम स्टेटची १९४६ मध्ये एडब्ल्यूबी अशी पासिंग होती. त्यानंतर हैदराबाद राज्यातील एचटीए, मग मुंबई स्टेटची बाॅम्बे अशी झाली. आता महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर एमएचए अशी पासिंग झाली आहे. ही कार पेट्रोल, डिझेल आणि तत्कालीन 'पॉवर' या रॉकेलपेक्षा थोड्याफार चांगल्या इंधनावरही चालते. 
 

बातम्या आणखी आहेत...