Home | Business | Industries | ford-motor-will-invest-money

फोर्ड गुंतवणार ७२ दशलक्ष डॉलर्स

वृत्तसंस्था | Update - May 19, 2011, 04:44 PM IST

भारतातील विक्री आणि निर्यात वाढविण्यासाठी फोर्ड मोटर तिच्या चेन्नईमधील प्रकल्पात ७२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुक करणार आहे.

  • ford-motor-will-invest-money

    बंगलुरू - भारतातील विक्री आणि निर्यात वाढविण्यासाठी फोर्ड मोटर तिच्या चेन्नईमधील प्रकल्पात ७२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुक करणार आहे. सन २०१२ च्या मध्यावर प्रकल्पाचा विस्तार पूर्ण होताच त्यात फोर्डच्या अतिरिक्त ८०.००० डिझेल इंजिन्सचे वार्षिक उत्पादन काढले जाईल.

    या विस्तारामुळे आम्ही भारतातील गुंतवणुकीला किती महत्व देतो ते अधारेखीत होते असे फोर्ड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मायकल बोनहॅम यांनी म्हटले आहे. या गुंतवणुकीमुळे फोर्डची भारतातील एकूण गुंतवणुक एक अब्ज डॉलर्सवर जाणार आहे. ही नवीन गुंतवणुक फोर्डच्या भारतातील प्रकल्पाला जागतिक निर्यात आणि उत्पादन हबमध्ये रूपांतरीत करण्याच्या नियोजनाचा भाग आहे.

Trending