आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्डची उपकंपनी लिंकनने पुन्हा आणली 60 च्या दशकातील प्रसिद्ध सुसाइड डोअरची काँटिनेंटल कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क-  लिंकन कार कंपनी काँटिनेंटल कारमध्ये पुन्हा ‘सुसाइड डोअर’ घेऊन आली आहे. या कारमध्ये मागील दार मागच्याऐवजी समोरच्या बाजूने उघडतेे. १९६० च्या दशकात अशा काँटिनेंटल कारला मोठी मागणी होती. सुरुवातीला खर्च कमी करण्यासाठी पुढील व मागील दोन्ही दरवाजांचे हँडल एकाच जागी ठेवण्यात आले होते. रोल्स रॉयस कारमध्येही असेच दरवाजे आहेत. काँटिनेंटल कारची विक्री झाल्यानंतर २००२ मध्ये उत्पादन बंद करण्यात आले होते. २०१६ मध्ये त्याना पुन्हा लाँच करण्यात आले. लिंकन फोर्डची उपकंपनी आहे. फोर्डचे संस्थापक हेनरी फोर्ड यांचा मुलगा एडसेलने खासगी वापरासाठी १९३९ मध्ये काँटिनेंटल कार बनवून घेतली होती. त्याच्या मित्रांच्या मागणीवरूनही काही कार बनवण्यात आल्या. १९६१ मध्ये विक्रीसाठी उत्पादन सुरू करण्यात आले.  


सुसाइड डोअर नाव का ?

चालत्या कारमध्ये दरवाजा उघडला तर हवेच्या दबावामुळे बंद करणे अवघड असते. त्यामुळेच याला सुसाइड डोअर नाव देण्यात आले. याला कोच डोअरही म्हणतात. त्यासाठी कारची लांबी ६ इंच वाढवली.

 
 काँटिनेंटल कारमध्येच माजी राष्ट्रपती केनेडी यांची हत्या 

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी यांना काँटिनेंटलमध्येही गोळी मारण्यात आली. त्यांची पत्नी जॅकलिन केनेडींकडेही काँटिनेंटल कार होती. प्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाबलो पिकासोकडे १९६३ मधील पांढऱ्या रंगाची काँटिनेंटल कार होती. 

बातम्या आणखी आहेत...