आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Foreign Drug Companies Will Decide Drug Price Up To Five Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी कंपन्या 5 वर्षांपर्यंत ठरवणार औषधांच्या किमती; भारतावर दबावाचा अमेरिकेचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय पेटंट कायद्यांतर्गत विदेशी कंपन्यांच्या ज्या औषधांचे पेटंट करण्यात येईल, सरकार त्यांचे दर पाच वर्षांपर्यंत निश्चित करणार नाही. म्हणजेच कंपन्या त्या औषधांचे दर निश्चित करण्यासाठी स्वतंत्र असतील. रसायन आणि खते मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. औषधी याच मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. पाच वर्षांचा कालावधी औषधींची विक्री सुरू झाल्याच्या दिनांकापासून पकडण्यात येईल. आतापर्यंत देशांतील कंपन्यांच्या पेटंट असलेल्या औषधांना पाच वर्षांपर्यंतची सूट मिळत होती. सध्या ड्रग प्राइझ कंट्रोल आॅर्डर' अंतर्गत नॅशनल फार्मा प्राइसिंग ऑथोरिटी' (एनपीपीए) अत्यावश्यक औषधी अाणि आरोग्य उपकरणाचे दर निश्चित करते. राज्यमंत्री मनसुख लाल मांडवीया यांनी राज्यसभेत सांगितले की, एनपीपीए पेटंट आणि पेटंट नसलेल्या औषधीमध्ये फरक करत नाही. वास्तविक पेटंट असलेल्या औषधींचीही कमाल किंमत निश्चित करण्याचा अधिकार आहे. अमेरिकी औषधी कंपन्या भारतीय व्यवस्थेचा विरोध करत होती. त्यांच्या निर्यातीवर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 

 

भारतावर दबावाचा अमेरिकेचा प्रयत्न : 
भारतीय निर्यातीवर शुल्कातील सूट रद्द करण्यावर विचार करत असल्याचे अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने एप्रिलमध्ये म्हटले होते. तेथील औषधी कंपन्यांसाठीच हा दबाव टाकण्याचा एक प्रयत्न होता. अमेरिकी कंपन्यांच्या संघटनेने व्यापार प्रतिनिधीला पत्र पाठवून ही सूट रद्द करण्याची मागणी केली होती. 

 

देशात नवी औषधे तत्काळ मिळतील, मात्र महाग 
किमतीवर नियंत्रण असल्याने विदेशी औषधी कंपन्या त्यांची नवी उत्पादने भारतात कमीच विक्री करतात. आता या कंपन्याही त्यांची औषधे लवकर आणतील, ज्याचा लोकांना फायदा होईल. मात्र, ही औषधी बरीच महाग असतील.