आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी सैन्याने अरब देशांपासून लांब राहावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान : विदेशी सेना अरब देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. त्यांनी लांबच राहायला हवे, अशी प्रतिक्रिया इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी सैन्याला अरब देशांमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रुहानी बोलत होते. विदेशी सैन्य येताना सोबत दु:ख आणि वेदना घेऊन येते, असे रुहानी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने सौदी अरबस्तानात दोन पेट्रोलियम रिफायनरींवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि सौदी अरबस्तानला या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा संशय आहे. रुहानी यांनी सांगितले की, काही दिवसांत इराण संयुक्त राष्ट्र संघात अरब देशांसाठी नवीन शांतता प्रस्ताव ठेवेल. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र करार मोडल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध बिघडले आहेत. १४ सप्टेंबर रोजी सौदीच्या दोन पेट्राेलियम रिफायनरींवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांची जबाबदार येमेनमधील हौती बंडखोरांनी घेतली होती. मात्र, सौदी अरबस्तान आणि अमेरिका या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरत आहेत. इराणने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. इराण-इराकदरम्यान १९८० - १९८८ दरम्यान झालेल्या युद्धाच्या वर्धापनदिनी रुहानी यांनी सांगितले की, विदेशी सैन्य आमच्या भागात फक्त अडचणी निर्माण करते आणि आमच्या लोकांमध्ये असुरक्षेचे वातावरण तयार करेल. याआधीही या भागात विदेशी सैन्य तैनात करण्यात आले होते. आता त्यांनी लांबच राहायला हवे, असे सांगत रुहानी म्हणाले की, जर अमेरिकेला गांभीर्य असेल तर त्यांनी आमच्या भागात सैन्य पाठवायला नको. ते जेवढे आमच्यापासून लांब राहतील तेवढेच सुरक्षित राहील. शांती करारावर ते म्हणाले की, याबाबत संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल. यापेक्षा अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, ते म्हणाले की, होर्मुज खाडीत विविध देशांच्या मदतीने शांतता प्रस्थापित झाली आहे. शेजारच्या देशांनी केलेल्या चुकीपासून इराणने धडा घेतला असून पुढे जाण्यासाठी तयार आहे. या ऐतिहासिक क्षणी आम्ही शेजारच्या देशांसाठी मैत्रीचा हात पुढे करत असल्याचे ते म्हणाले.

येमेनचे हौती बंडखोरांनीही शांततेसाठी सौदी अरबस्तानात हल्ले करणार नसल्याचे म्हटले अाहे. येमेनचे संयुक्त राष्ट्र संघातील विशेष दूत मार्टिन ग्रिफिथ यांनी म्हटले आहे की, या संधीचा फायदा घेत हिंसा कमी करण्यासाठी पावले टाकायला हवीत.
 

बातम्या आणखी आहेत...