आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देह विक्रीचे अड्डे बनले होते स्पा सेंटर; 14 ठिकाणी धाड टाकून 35 जण ताब्यात, 5 फॉरेनर तरुणींचाही समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा(उत्तर प्रदेश)- देह व्यापार होत असल्याची सूचना मिळाल्यानंतर रविवारी संध्याकाळी नोएडा सेक्टर-18 च्या 14 स्पा सेंटरमध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी छापेमारी केली. यात 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, यात 25 महिलादेखील आहेत. पोलिसांनी हे सर्व स्पा सेंटर सील केले आहेत. जेव्हा ही माहिती पसरली तेव्हा अनेक स्पा सेंटर चालवणाऱ्यांनी सेंटर बंद करून फरार झालेत.

 

एसएसपी वैभव कृष्ण यांनी सांगितल की, स्पा सेंटर्सवर छापेमारी रात्री उशीरापर्यंत सुरुच होती. यात 5 परदेशी तरुणींनाही पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये जप्त करण्यात आलेत. ही कारवाई 14 पोलिस टीमने मिळून केली. यात 7 सर्कल ऑफिसर, 5 एसएचओ, 30 सब इंस्पेक्टर आणि महिला कॉन्स्टेबल सामिल होते.


स्थानिक पोलिस स्टेशनला माहितीच नाही
हे सर्व स्पा सेंटर सेक्टर-20 पोलिस स्टेशन अंतर्गत येतात. या कारवाईबद्दल या परिसरातील पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली नव्हती. एसएसपीने सांगितले की, स्पा सेंटर सुरू असण्यामध्ये पोलिसांच्या भूमिकेलाही तपासण्यात येईल. जर यात पोलिसांचे संगनमत समोर आले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.