आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरात तालुक्यात दोन गावात वन विभागाचे छापे, चार लाखांचे अवैध लाकूड व इतर साहित्य जप्त 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- तालुक्यात वडकळंबी व भामरमाळ या गावात नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल प्रथमे हाडपे यांनी अवैध लाकूड तोडीचे कारखान्यावर वर छापा टाकून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वन विभागाचे वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन नवापूर वनक्षेञातील मौजे वडकळंबी व भामरमाळ येथील शेगा रेशमा गावीत रा वडकळंबी व यशंवत गोमा गावीत (रा. भामरमाळ) या दोघांच्या घराची झडती घेतली. दोन्ही ठिकाणी रंधा मशिन व ताजा तोडीचा साग,सिसम,व आड जात चोपट तसेच भामरमाळ येथील झडतीत तयार दरवाजा शटर 3 व बोकस पलग इ.लाकुड मुद्देमाल यंत्र सामुग्री सह जप्त करुन खाजगी व शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय वन आगारात जमा करण्यात आला. सदर जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 4 लाख इतकी आहे.  सदर कार्यवाही ही उपवनस्वरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा व विभागीय वनअधिकारी दक्षता पथक धुळे यांचा मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनक्षपाल प्रथमेश हडपे,वनपाल प्रकाश मावची,डी के जाधव, वनरक्षक कमलेश वसावे,नितिन पाटील,दिपक पाटील,सतिष पदमोर,संजय बडगुजर,संतोष गायकवाड,रामदास पावरा,अशोक पावरा,लक्ष्मण पवार,श्रीमती दिपाली पाटील,संगिता खैरनार,आरती नगराळे,तसेच वनमजुर व नंदुरबार, चिंचपाडा वनक्षेञातील कर्मचारी वृंद,वाहन चालक भगवान साळवे,एस.एस तुंगार,आबा न्याहळदे,माजी सैनिक विशाल शिरसाठ,रविंद्र कासे यांनी केली. वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक यांनी आरोपी विरुध्द वन गुन्हा नोंद केला आहे.व पुढील तपास सुरु आहे.सदर ही कार्यवाही मुळे नवापूर तालुक्यातील अवैधरित्या लाकुड व्यवसाय करण्याचे धाबे दणाणले असुन यापुढे अशीच मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती गणेश रणदिवे व प्रथमेश हाडपे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...