आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमा ही एखादी वाईट घटना विसरण्याएवढी सशक्त असावी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी सकाळी मणिपूरच्या भोगावस्थित जवाहर नवोदय विद्यालयाच्या अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या प्रार्थना सभागृहात आत्महत्या केली. कारण चोरीच्या आरोपामुळे गेल्या तीन वर्षांपासून तिचा सर्वजण तिरस्कार करत होते. ही घटना समजल्यानंतर मला सोमवारी रात्री झोप आली नाही. तीन वर्षांपूर्वी मित्राच्या दप्तरातून तिने नमकीनचे पॅकेट चोरण्याचा गुन्हा केला होता. या कारणासाठी ही मुलगी इतकी टोकाचे पाऊल उचलू शकते, यावर माझा विश्वासच बसेना.  घटनास्थळी जी चिठ्ठी मिळाली त्यात त्या मुलीने लिहिले होते की “ ही चूक मी तीन वर्षांपूर्वी केली होती, त्याची शिक्षा मला गेली तीन वर्षे भोगावी लागत आहे. मी आजवर कोणाशीही खोटे बोलले नाही. माझ्या जवळच्या लोकांनीही माझ्यावर प्रेम करणे सोडून दिले. माझे मित्रच जर माझ्यावर विश्वास ठेवत नसतील तर मी येथे बारावीपर्यंत कशी टिकू शकेन?’  तिच्या वर्गातील मित्राने पत्रकारांना सांगितले की, तिची चोरी पकडली गेल्यानंतर तिच्या सीनियर विद्यार्थ्यांनी तिला ४८ मित्रांकडून कानशिलात लगावण्याची सजा फर्मावली. या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना होती, पण कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. यावरून मला पुराणातील नैतिक कहाण्या आणि काही चित्रपट आपले मन बदलण्यात कशी मोठी भूमिका निभावतात ते मला आठवले. रामायणात प्रभू श्रीरामचंद्रांचा दयाळूपणा आणि महाभारतात युधिष्ठिराचे धैर्य आणि क्षमाक्षीलतेमुळे ते नेहमीच लक्षात राहतात. यासंदर्भात मला लहानपणी ऐकलेली कहाणी आठवते. पांडव द्वैतवनात असताना सिंधू देशाचा राजा आणि दुर्योधनाचा मेहुणा जयद्रथ आपल्या सेनेसमवेत तेथून चालला होता. तेथे पांडवांच्या कुटीत द्रौपदी एकटीच असलेली त्याने पाहिली. ते तिला जबरदस्तीने उचलून घेऊन रथातून जाऊ लागले. ही गोष्ट थोडक्यात सांगायची झाली तर शेवटी भीम आणि अर्जुन त्याना पकडतात, मारायचा प्रयत्न करतात. पण दुर्योधनाच्या बहिणीचा विचार करून युधिष्ठिर मधे पडून इशारा देऊन त्यांना सोडून देतो. सर्व काही होऊनही काका धृतराष्ट्र यांना युधिष्ठिर दुखवत नाही, यातच त्याचे मोठेपण दिसून येते.  अमिताभ-शशी कपूर यांचा दिवार हा चित्रपट आठवतो का? आपल्या भुकेल्या आईवडिलांसाठी पाव चोरणाऱ्या मुलावर इन्स्पेक्टर रवी (शशी कपूर) गोळी झाडतो. पण आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर रवी त्या मुलाला आपल्या घरी जेवायलाच घेऊन येतो आणि त्याच्या आई-वडिलांची क्षमा मागतो. तेथे त्या मुलाची आई रवीला काही बोलते पण वडील, चोरी ही चोरीच असते, असे सांगून रवीला माफ करतात. एका गरीब वडिलांनी केलेली क्षमा, रवीला वाईट गोष्टीच्या विरोधात लढण्यासाठी अधिक प्रेरित करते, ज्यात त्याचा भाऊही सामील असतो.  याच वर्षात गेल्या महिन्यात बहारीन देशाने पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या दौऱ्यानिमित्त सद॰भावना म्हणून २५० भारतीय कैद्यांची मुक्तता केली. सरकारी शब्दावलीमध्ये क्षमादान म्हणजे कथित गुन्हा किंवा कायद्यानुसार झालेल्या गुन्ह्यातून दोषमुक्त करणे, जणू काही हा गुन्हा कधी घडलाच नव्हता. यात “कधी झालाच नाही “ हा शब्द लक्षात ठेवा.  

बातम्या आणखी आहेत...