आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका झटक्यात आयुष्याची 39 वर्षे विसरली; 56 वर्षांच्या किम, 17 वर्षांसारख्या वागतात 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - ५६ वर्षीय किम हॅरिस डॅनिकोलासोबत तीन महिन्यापूर्वी जे घडले ते फक्त चित्रपटात पाहण्यास मिळते. परंतु तिच्याबाबतीत हा प्रसंग सत्यात उतरला आहे. चर्च पार्कमध्ये गेलेल्या किम अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा १७ वर्षे वयाच्या मुलीसारखे वागू लागल्या. त्यांना मुलांचे व पतीचे नावही आठवत नव्हते. हे १९८० वर्ष आहे. त्यांचे वय १७ आहे व त्या सीनियर सेकंडरीच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेची बस पकडण्याची घाई होती आणि अचानक बेशुद्ध झाल्या, इतकेच आठवत होते. 


कुटुंबाकडून शिकतात २०१९ मध्ये वावरण्याची पद्धत 
किमसाठी २०१९चे तंत्र शिकून घेणे खूप अवघड जात आहे. त्या म्हणतात, माझ्या पतीने सांगितले, ज्या दिवशी माझी स्मरणशक्ती गेली तेव्हा माझे डोके खूप दुखत होते. मी डोकेदुखी थांबण्याचे औषध घेतले. कदाचित त्या औषधाच्या रिअॅक्शनमुळे माझी स्मरणशक्ती गेली असावी. मी रुग्णालयात गेले. तेथे आरशात माझी प्रतिमा पाहिली आणि मीच खूप हैराण झाले. कारण मी तशी नव्हतेच. मला ती ५६ वर्षाची महिला दिसत होती. माझे वय तर आता १७-१८ वर्षे आहे. घरात जेव्हा संगणक पाहिला तेव्हा वाटले हा टीव्ही असावा. 


जाणून घ्या.. ट्रांझिट ग्लोबल अॅमनिझिया 
ट्रांझिट ग्लोबल अॅमनिझिया अचानक तात्पुरती स्मरणशक्ती नाहीसा करणारा आजार आहे. यात रुग्णास घटना आठवत नाहीत. आपण कधी, कोठे होतो हेही आठवत नाही. आयुष्यातील काही दिवस, महिने अथवा वर्षेसुद्धा विसरून जातो. डॉक्टरांच्या मते, रुग्णास हळूहळू हे आठवू लागते. जगात एक लाखापैकी ५ जणांना हा रोग होऊ शकतो. 


संगणक, मोबाइल म्हणजे काय? 
किमच्या पतीने सांगितले, रुग्णालयात नेल्यानंतर किम जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा नर्सने तिला विचारले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तेव्हा किम म्हणाली, हो, मला माहिती आहे. रोनाल्ड रेगन. तिने मला व मुलांना ओळखले नाही. फक्त माझे आई-वडील या जगात नाहीत, हेच सांगून ती रडत हाेती. तिच्या अनेक चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, किमला ट्रांझिट ग्लोबल अॅमनिझियाचा आजार झाला आहे. यात व्यक्तीची स्मरणशक्ती अचानक जाते. आयुष्यातील ३९ वर्षे किम विसरून गेली आहे. इतक्या दीर्घ कालावधीतील आठवणी पुन्हा आणणे कदाचित अवघड असेल. ती ८० च्या दशकात जगते आहे. तेव्हा संगणकही नव्हता आणि मोबाइल फोनही नव्हते. आम्ही तिला मोबाइल व टीव्हीबाबत समजावून सांगण्यात अद्याप तरी यशस्वी ठरलो नाही, असे त्यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...