आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: शेतकऱ्याचा मुलगा ते विख्यात अर्थशास्त्रज्ञ, मनमोहन असे बनले देशाचे पंतप्रधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वतंत्र भारतात अनेक पंतप्रधान झाले आहेत, परंतु आपल्या कामगिरीने यापैकी काहींचीच इतिहासात नोंद झाली. देशाचे पंतप्रधानांना एक तर त्यांच्या कामामुळे किंवा त्यांच्याशी निगडित विवादामुळे ओळखले जाते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 26 सप्टेंबर हा वाढदिवस आहे. या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे त्यांच्याशी निगडित काही महत्त्वाच्या बाबी. 

 

इंग्लंडच्या थंडीत सकाळी 4 वाजता अंघोळ... 
- अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती म्हणाले की, जेव्हा ते आणि त्यांचे मित्र मनमोहन सिंग केंब्रिज युनिव्हर्सिटीत शिकत होते तेव्हा एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे तरुण सकाळी 4 वाजता उठून अंघोळ करायचे. भगवती सांगतात की, त्या वेळी मनमोहन म्हणाले होते की, त्यांची ही रुटीन फॉलो करण्याची सवय त्यांना एक ना एक दिवस यशोशिखरावर जरून नेईल आणि झालेही तसेच.
- माजी पंतप्रधानांचा जन्म फाळणीच्या आधी पंजाबच्या गाह बेगल गावात 1932 मध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. जन्मतारखेवर मनमोहन म्हणतात, 26 सप्टेंबर एवढ्यासाठीच कारण शाळेच्या नोंदीत तसे आहे.

 

असे बनले देशाचे पंतप्रधान
- मनमोहन सिंग 72 वर्षे वयात देशाचे पंतप्रधान बनले. दरम्यान, त्यांनी अनेक आयोगांचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या शांत स्वभावामुळे विरोधकांना नेहमी अनामिक भीती वाटत राहिली.
- डॉ. मनमोहन सिंग 22 मे 2004 रोजी देशाचे पंतप्रधान बनले. याआधी नरसिंहा राव सरकारमध्ये 1991 मध्ये ते अर्थमंत्री होते. त्या वेळी त्यांच्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला.
- केंब्रिजहून परतल्यानंतर मनमोहन यांनी पंजाब विद्यापीठात येऊन शिकवले आणि नंतर डी. फिल करून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटित गेले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवत असताना ते वित्त मंत्रालयाचे सचिव बनले, योजना आयोगात गेले. 1982 मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनले आणि योजना आयोगाचे उपाध्यक्षपदही भूषवले. व्ही.पी. सिंह सरकारमध्ये ते पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागारही राहिले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, माजी पीएम यांची वक्तव्ये जी माध्यमांत झळकली आणि रेअर फोटोज... 

 

 

बातम्या आणखी आहेत...