राष्ट्रीय / आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या, राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


राव यांनी अनेकवेळा विविध मंत्रिपदही भूषवले होते

दिव्य मराठी वेब

Sep 16,2019 02:50:00 PM IST

हैदराबाद- आंध्र प्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हैदराबादमधील आपल्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. 72 वर्षीय कोडेला शिव प्रसाद राव राज्यातील विरोधी पक्ष "तेलुगू देशम पार्टी"चे सर्वात जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. राव यांच्यावर विधानसभेची संपत्ती चोरी केल्याच्या आरोप होता.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राव यांना बसवतारकम रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी ते मृत असल्याचे घोषित केले. त्यांच्या कुटुंबात पत्नी शशिकला, कन्या डॉ. विजया लक्ष्मी आणि दोन मुले डॉ. शिव राम कृष्ण आणि डॉ. सत्यनारायण आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या मृत्यूवर दुखः व्यक्त केले आहे.

1983 मध्ये राव तेदेपामध्ये सामील झाले होते. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर राव 2014 मध्ये विधानसभा अध्यक्ष बनले होते. ते 6 वेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत. राव यांनी 5 वेळा नरसरावपेटमधून आणि 2014 मध्ये सत्तेनापल्लीमधून विजय मिळवला होता. त्यांनी अनेकवेळा विविध मंत्रिपदही भूषवले होते.

X
COMMENT