आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना 7 वर्षांचा तुरुंगवास; भ्रष्टाचार प्रकरणात दोषी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> झिया यांनी आपल्या संस्थेला अज्ञात स्रोतांकडून निधी देण्याच्या प्रकरणात दोषी
> फेब्रुवारीपासून तुरूंगात, भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणात दोषी आढळल्याने 5 वर्षांचा तुरुंगवास 
> झिया 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या

 

 

ढाका- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना कोर्टाने भ्रष्टाचार प्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अज्ञात स्त्रोतांकडून आपल्या संस्थेला निधी मिळवून दिल्याप्रकरणी झिया यांना कोर्टाने दोषी ठरविले. या प्रकरणी आणखी तीन जणांना शिक्षाही देण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या प्रकरणामुळे झिया तुरुंगात आहे.

 

फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशातील एका विशेष कोर्टाने घोटाळ्याच्या प्रकरणात झिया यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांना अनाथ आश्रमाच्या नावाखाली निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणात त्यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतर चार जणांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणात झिया यांच्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

याआधी, बांगलादेशच्या न्यायालयाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवडणुकीच्या मेळाव्यातील ग्रेनेडवरील हल्ल्याच्या संबंधात झिया यांचा मुलगा तारिक रहमानसह 38 जणांना दोषी ठरवले होते. कोर्टाने तारिकसह 19 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उर्वरित 19 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...