Home | Maharashtra | Mumbai | Former banker and Aam Aadmi Party member Meera Sanyal passes away

मुंबईतील 'आप'चा मोठा चेहरा हरपला, मीरा सान्याल यांचे निधन, मुंबई हल्ल्यानंतर बदलले होते जीवन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 03:25 PM IST

राजकारणात येण्यापूर्वी मीरा सान्याल रॉय बॅंक ऑफ स्कॉटलंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

  • Former banker and Aam Aadmi Party member Meera Sanyal passes away

    मुंबई- आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि बॅंकर मीरा सान्याल (58) यांची शुक्रवारी मुंबईत निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते.

    कोची येथे जन्मलेल्या मीरा सान्याल यांनी रॉय बॅंक ऑफ स्कॉटलंडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नोकरी केली. सान्याल यांनी बँकिंग क्षेत्रात 30 वर्षांची प्रदीर्घ सेवा दिली. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. सान्याल यांच्या निधनावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपच प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

    मुंबईतील 'आप'चा मोठा चेहरा हरपला
    मीरा सान्याल यांनी बॅंकेची नोकरी सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मीरा सान्याल यांनी दक्षिण मुंबईमधून निवडणूक लढ‍वली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मीरा सान्याल यांच्या निधनाचे वृत्त ट्‍वीट केले. मनीष सिसोदिया यांनी सन्याल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक उत्तम अर्थतज्ज्ञ गमावल्याचे सिसोदिया यांनी आपल्या ट्‍वीटमध्ये म्हटले आहे. शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांनीही सान्याल यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केला.

Trending