आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former BF Jawan Tej Bahadur Will Contest Against PM Modi In Lok Sabha Chunav 2019

सैनिकांना खायला देतात करपलेली पोळी आणि पातळ दाळ - हे सांगणारा BSF चा माजी सैनिक लढणार निवडणूक; ज्या कारणामुळे केले होते बर्खास्त, निवडणूकीसाठी तोच बनवणार मुद्दा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी (उत्तर प्रदेश) - सीमा सुरक्षा दलातील खराब जेवणावर प्रश्न उठवणारा जवान तेज बहादुर यादवने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकीच्या या रंणागणात उतरण्यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मतदार संघ वाराणसीची निवड केली आहे. रेवारी येथील रहिवासी असलेले यादव सोशल मीडियावर त्यांचा एक वीडिओ अपलोड झाल्यानंतर चर्चेत आले आहेत. यानंतर त्यांना अनुशासनहीनेचा दोषी ठरवत नोकरीवरून निलंबीत करण्यात आले होते.

 

खराब जेवण देत असल्याचा केला होता आरोप 

> 2017 मध्ये तेज बहादुरचा एक वीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने लष्करातील सैनिकांना खराब जेवण देत असल्याचे सांगितले होते. त्यांनी वीडिओमध्ये सांगितले होते की, सैनिकांना जेवणामध्ये जळालेली पोळी आणि पातळ दाळ मिळते. यामुळे अनेक वेळा उपाशी पोटी झोपावे लागते. 

> त्यांचा हा वीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर याप्रकरणाबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बीएसएफकडून अहवाल मागवला होता. 

 

आवाज उठवल्यामुळे केले निलंबीत :  यादव 

> तेज बहादुरने शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, तो अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. पुढे बोलताना तो म्हणाला की, मी लष्कारात होत असलेल्या भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. 

> मोदी भ्रष्टाचार मुक्त भारत बद्दल बोलत असतात, मी त्यांचाच आदर्श घेऊन आवाज उठवला होता. पण यामुळे मला निलंबीत करण्यात आले. आता त्याच मुद्द्याला मी जनतेचा आवाज बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

मुलाने केली होती आत्महत्या

> निलंबीत जवान तेज बहादुरच्या 22 वर्षीय मुलगा रोहितने यावर्षी 17 जानेवारी रोजी स्वतःला गोळी मारत आत्महत्या केली. रोहित दिल्ली विद्यापीठात बीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. 

> यापूर्वी आणखी एक फोटो व्हायरल झाला होता. तो तेज बहादुर यांचा सांगण्यात आला. त्यामध्ये सांगितले की, हा तेज बहादुर यांचा फोटो असून त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर त्यांच्या पत्नीला मीडियासमोर येऊन या सर्व अफवा असल्याचे सांगावे लागले होते. 

बातम्या आणखी आहेत...