आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे 28 नोव्हेंबर (गुरुवार) रोजी सकाळी 10 वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यामुळे वाघ कुटुंबीय आणि भाजपाच्या कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत.


भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे सकाळी आंघोळीला गेले असता 20 मिनिटं झाली तरी ते बाहेर येत नव्हते. मुलगी भैरवी सासरी जाणार होती म्हणून ती त्यांना निरोप देण्यासाठी आवाज दिला त्यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून शंका आली दरवाजा फोडून बाहेर काढले. त्यांना डॉ निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांस तपासून मृत घोषित केले. त्यांना अचानक ह्रदय विकाराच्या तीव्र झटका आला त्यामुळे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीय, नातेवाईक आणि भाजपसह सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रुग्णालयात व त्यांच्या घरी गर्दी केली होती. त्यांच्या मागे आमदार स्मिता वाघ दोन मुली, जावाई असा परिवार आहे.बातम्या आणखी आहेत...