आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपील देव यांनी दिला सीएसीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा, बीसीसीआयचे एथिक्स अधिकारी डीके जैन यांनी पाठिवली होती नोटिस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- माजी भारतीय कर्णधार कपिल देवने अज(बुधवार) क्रिकेट सल्लगार समिती (सीएसी) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. हिससंबंधाप्रकरणी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय)चे एथिक्स अधिकारी डीके जैनने सीएसीला नोटिस पाठवली होती. कपिल यांनी नोटिस मिळाल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आधी सीएसीच्या सदस्या शांता रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जैन यांनी समितीच्या सदस्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
 


कपिल देव यांनी प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय आणि बोर्डाचे सीईओ राहुल जौहरी यांना ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी लिहीले, "अॅड-हॉक सीएसीचा भाग होणे आनंदाची गोष्ट होती. मेन्स क्रिकेट टीमसाठी प्रशिक्षक निवडणे विशेष होते. मी तत्काळ माझ्या पदाचा राजीनमा देतोय."

सीएसीने रवी शास्त्रींना प्रशिक्षक निवडले होते
सीएसीने मागच्या महिन्यात रवी शास्त्री यांना भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. सीएसीमध्ये कपील आणि शांता यांच्या शिवाय अंशुमान गायकवाड होते. सीएसीला नोटिस मिळाल्यामुळे रवी शास्त्रींची नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चौकशीनंतर बीसीसीआयला त्यांना परत कोचपदी निवडावे लागले. शास्त्री पहिल्यांदा 2017 मध्ये टीमचे कोच झाले होते.

बातम्या आणखी आहेत...